एकाची पावणेचार लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

इंटरव्हयूच्या बहाण्याने बोलवून एकाचा मोबाईल घेऊन जाऊन पावणेचार लाख रुपयांची ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अमरेंद्र कुलकर्णी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी : इंटरव्हयूच्या बहाण्याने बोलवून एकाचा मोबाईल घेऊन जाऊन पावणेचार लाख रुपयांची ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अमरेंद्र कुलकर्णी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    प्रवीण माथुर व एक हिरव्या रंगाचा टी शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेला तोंडाला मास्क लावलेला तरुण वय अंदाजे २५ ते ३० वर्ष पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही. या दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ ऑगस्टला सकाळी १० ते दुपारी १.३० या दरम्यान धर्मशी माईलस्टोन बिल्डिंग, चांदणी चौकाजवळ बावधन येथे घडली होती.

    फिर्यादी यांना बावधन येथे बंधन बँकेचे इंटरव्हयू घेण्याच्या बहाण्याने आरोपी माथुरने दुसऱ्या आरोपीस फिर्यादी सोबत मीटिंग करण्यासाठी पाठवले. त्या आरोपीने फिर्यादीचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल लबाडीने घेऊन गेला. दोघा आरोपींनी संगनमताने फिर्यादी यांच्या मोबाईलवरून नेटबँकिंगद्वारे एकूण ३.७५ लाख रुपयांची फसवणूक करुन अपहार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.