लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद; दरात घसरण होत असल्याने शेतकरी संघटना आक्रमक

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावल्यानंतर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडले. कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ हटवावी, कांद्याला हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

    लासलगाव : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावल्यानंतर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडले. कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ हटवावी, कांद्याला हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

    केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात कांद्याचे दर सातत्याने कोसळू लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी कांद्याचा 1600-1800 रुपये सरासरी दर कमी होऊन तो 900 ते 1000 रुपयांवर आला आहे. सातत्याने भाव काेसळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. आजही लासलगाव बाजार समितीत कांद्याचा दर क्विंटलला 1000 रुपयांवर आला. यामुळे शेतकरी संतप्त झाले.