कांदा लिलावावरील विघ्न काय दूर होईना अन् लिलाव पूर्ववत होईना; लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव शेतकऱ्यांनी पाडले बंद

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव (Onion Auction) पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, सुरु झालेले लिलाव दोन तासांत बंद पडले. कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आहेत.

    नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव (Onion Auction) पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, सुरु झालेले लिलाव दोन तासांत बंद पडले. कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर (Onion Export) लावलेल्या शुल्कामुळे शेतकरी संतप्त झाले होते. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्या बंद होत्या.

    केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा लिलाव प्रश्नी मध्यस्थी केली होती. त्यांची ही मध्यस्थी यशस्वी ठरली असून, आजपासून बाजार समित्यांचे कामकाज पुन्हा सुरु झाले. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये देखील सकाळपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरु झाले. केंद्र सरकार नाफेडमार्फत 2410 प्रतिक्विंटल भावाने 2 लाख मेट्रिक टन इतका कांदा खरेदी करेल, अशी घोषणा सरकारने केली. मात्र, तरीही कांद्याला कमी भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा लिलाव बंद पाडले. कांद्याला किमान 30 ते 40 रुपये भाव मिळावा. निर्यात शुल्क शून्य करावं अशी मागणी शेतकरी करत आहेत.

    केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या शुल्कामुळे शेतकरी संतप्त झाले होते. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्या बंद होत्या. त्यानंतर केंद्र सरकार नाफेड मार्फत 2410 प्रतिक्विंटल भावाने 2 लाख मेट्रिक टन इतका कांदा खरेदी करेल अशी घोषणा सरकारने केली. मात्र, तरीही कांद्याला कमी भाव मिळत असल्याने संतप्त शेतक-यांनी पुन्हा लिलाव बंद पाडले आहेत.