बदलत्या हवामानाचा कांदा पिकाला फटका; कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता

सततच्या बदलत्या हवामानामुळे कांदा पिकाला फटका बसत असल्याने येवला तालुक्यातील शेतकरी हा चिंताग्रस्त झाला असून कांद्यावर करपा, मावा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे महागडी औषधे फवारण्याची वेळ आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर येत आहे. 

नाशिक : सततच्या बदलत्या हवामानामुळे कांदा पिकाला फटका बसत असल्याने येवला तालुक्यातील शेतकरी हा चिंताग्रस्त झाला असून कांद्यावर करपा, मावा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे महागडी औषधे फवारण्याची वेळ आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर येत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून येवला तालुक्यासह परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून सतत बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकाला याचा फटका बसत आहे. तर रात्रीपासून पाऊस बरसत असल्याने आता कांदा पिकावर कारपा, मावा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने अक्षरश: महागडी औषधे फवारून देखील काही उपयोग होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी परत एकदा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे महागडी औषध फवारल्यानंतर पाऊस येतो परत औषध धून निघत असल्याने औषधाचा कोणताही परिणाम या पिकावर होत नाही.

परिणामी मावा व करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने कांदा उत्पादनात नक्कीच मोठ्या प्रमाणात घट निर्माण होणार असल्याची भीती कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.