
सहा महिने उलटून गेले परंतु अजूनही कांद्याला हवा तसा भाव मिळत नाहीये.
नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. कांद्याचे भाव वाढतील या उद्धेशाने त्यांनी कांद्याची साठवणूक केली. परंतु सहा महिने उलटून गेले परंतु अजूनही कांद्याला हवा तसा भाव मिळत नाहीये. बदलते हवामान तसेच मागील काही दिवसांपूर्वी बाजार समित्या बंदचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून येवला तालुक्यातील नगरसुल गावातील कांदा उत्पादक शेतकरी संजय गंडाळ यांचा कांदा खराब होत असल्याने कांदा जनावरांना खायला देण्याची वेळ आली आहे.
कांद्याला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवला होता. मात्र, साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने अक्षरशः कांदा वाळवण्याची देखील वेळ या शेतकऱ्यांवर येत असून खराब झालेला कांदा अक्षरशः जनावरांना खाऊ घालत आहेत. त्यामुळे हा कांदा उत्पादक शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. याचसंदर्भात कांदा उत्पादकानी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी म्हणाले, एप्रिल ते मे महिन्यामध्ये आम्ही कांद्याची साठवणूक केली होती २ पैसे जास्त मिळतील या हिशोबाने. अवकाळी पावसामुळे कांद्याची प्रचंड नुकसान झाले. सरकारने जे काही आता ४०% पर्यत निराश शुल्क वाढवले आहेत त्यामुळे कांद्याचे भाव पडले.
शेतकऱ्याला २ रुपये जास्त मिळाले असते ते सुद्धा मिळत नाहीये. नाफेडने खरेदी चालू केली परंतु ती खरेदी फक्त कागदोपत्री करण्यात आली आहे. परंतु अजून पर्यत कोणीही कांदा खरेदी केला नाही. नाफेड १ नंबरचा कांदा खरेदी करणार आहे त्यामुळे २ नंबर आणि ३ नंबर प्रतीचा कांदा खरेदी कोण करणार? हा प्रश्न शेतकऱ्यांने सरकारला विचारला आहे. जेव्हा कांदा ३००० ते ४००० रुपयांच्या वरती विकला जाईल तेव्हा शेतकऱ्याला २ पैसे जास्त भेटणार आहे. जे काही ७०% ते ८०% नुकसान झाले आहे आणि शेतकरी मेटाकुटीला आला आहे . भीषण दुष्काळ सुरु आहे आणि आताची खरीप पीक संपूर्ण वळून गेली आहे.