कांद्याचे दर चांगलेच गडगडले; प्रति किलो दर पोहोचले…

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर कांद्याचे दर झपाट्याने खाली आले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मेहनतीने पिकविलेला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

    बीड : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर कांद्याचे दर झपाट्याने खाली आले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मेहनतीने पिकविलेला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बीडमधील एका शेतकऱ्याच्या इतकाच भाव मिळाला शेतात अक्षरशः कांद्याचा सडा पडला आहे.

    वैभव शिंदे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते नेकनूर गावातील रहिवासी आहे. आम्ही दोन एकरात कांदे लावले होते. त्यासाठी मोठा खर्च आला होता. या कांद्यावर कुटुंबाची गुजरान होईन, असं वाटलं होतं. मात्र, त्याचं कांद्याने डोळ्यात पाणी आणले, अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.

    कांद्याला प्रतिकिलो 1 रुपया आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने कांदा बांधावर फेकून दिला असून, कवडीमोल भावामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवं. वैभव यांचा कांद्याला प्रतिकिलो 1 रुपया इतकाच भाव मिळाला. यामुळं त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. उलट 558 रुपये तेथील आडत दुकानदाराला देण्याची वेळ वैभव शिंदे यांच्यावर आली. कांदा तर गेलाच मात्र एवढी मेहनत घेऊन आडत दुकानदाराला देखील पैसे द्यावे लागले.

    वैभव यांच्याकडे 7 एकर शेती असून यामध्ये त्यांनी दोन एकरमध्ये कांदा पिकाची लागवड केली होती. यासाठी त्यांना 70 हजार रुपये खर्च आला. उसनवार करून, कर्ज घेऊन लावलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल आणि आपली आर्थिक घडी बसेल, असे स्वप्न शिंदे यांनी उराशी बाळगलं होतं. मात्र, जेव्हा सोलापूरच्या मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी नेला, तेव्हा त्याला कवडीमोल भाव मिळाला.