आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण; सध्या किलोला दर किती?

निर्यातबंदी, तसेच ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीस पाठविल्याने दरात मोठी घट झाली आहे. किरकोळ बाजारात लाल कांद्याचे प्रतिकिलोचे दर २५ ते ३० रुपये दरम्यान आहेत.

    पुणे : नवीन लाल कांद्याची आवक राज्यातील प्रमुख बाजारांत मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. महिनाभरापूर्वी कांदा तेजीत होता. नवीन लाल कांद्याची नगर, सोलापूर, पुणे बाजार समितीच्या आवारात आवक वाढल्याने कांदा दरात घसरण झाली आहे. निर्यातबंदी, तसेच ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीस पाठविल्याने दरात मोठी घट झाली आहे.

    किरकोळ बाजारात लाल कांद्याचे प्रतिकिलोचे दर २५ ते ३० रुपये दरम्यान आहेत. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याचे दर १५० ते २५० रुपये दरम्यान आहेत.