कांदा पुन्हा रडवणार, आजपासून राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कांदा लिलाव बंद, काय आहेत मागण्या?

एकीकडे कमी पावसामुळे दुष्काळाचे सावट असताना दुसरीकडे ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्याने कांदा महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    नाशिक : कांद्यावरील (Onion) निर्यात शुल्क केंद्र सरकारने वाढवल्यामुळं मागील महिन्यात कांदा लिलाव व विक्री बंद ठेवत, व्यापारी संपावर गेले होते. ही घटना ताजी असताना, आता पुन्हा एकदा कांदा व्यापारी आक्रमक झाले असून, पुन्हा एकदा कांदा रडवणार का, पुन्हा एकदा कांदा डोळ्यात पाणी आणणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण नाशिक जिल्ह्यातील कांद्या व्यापाऱ्यांनी विविध आणि प्रलंबित मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Onion will cry again, from today, onion auction will be closed in ‘this’ district of the state, what is the demand)

    कुठे कांदा विक्री व लिलाव बंद

    दरम्यान, एकीकडे कमी पावसामुळे दुष्काळाचे सावट असताना दुसरीकडे ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्याने कांदा महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व 17 बाजार समिती आणि उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. गणपतीच्या तोंडावर कांदा व्यापाऱ्यांनी संप केल्यामुळं ग्राहकांचे मोठ हाल होणार असल्याचं बोललं जातंय.

    काय आहेत मागण्या…

    नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये. कांद्यावर लादलेले 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करा. आडत घ्यावी या शेतकरी हिताच्या मागण्या मान्य करा, तसेच बाजार समितीने आकारलेल्या मार्केट फिचा दर प्रति शेकडा 100 रुपयास 1 रुपया याऐवजी 100 रुपयास 0.50 पैसे या दराने करण्यात यावा. आडतीचे दर संपूर्ण भारतात एकच 4% दराने अडतीची वसुली विक्रेत्यांकडून करण्याची पद्धत करण्यात यावी.  दयाची निर्यात होण्यासाठी 40% डयुटी तात्काळ रदद् करण्यात यावी. कांदा व्यापारावर सरसकट 5% सबसिडी आणि देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट 50% सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी. आजी मागण्या कांदा व्यापाऱ्यांच्या आहेत. दरम्यान, या बंदमुळं दररोज अंदाजे 30 ते 40 कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे.