कांदा बाजारभावातील घसरण थांबविण्यासाठी छगन भुजबळ आक्रमक, उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

कांदा बाजार भावातील घसरण (onioins tates decline) थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना (state government solution) करण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांच्याकडे केली आहे.

    नाशिक : कांद्याच्या (onion) दरात सातत्याने घसरण होत असून, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (state onion farmers) अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा बाजार भावातील घसरण (onioins tates decline) थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना (state government solution) करण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची ते भेट घेणार आहेत.

    दरम्यान, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविणारे राज्य असून, भारतातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३३ टक्के वाटा आहे. महाराष्ट्रातील सरासरी उत्पादन इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. शिवाय येथील कांद्याची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर, धुळे, बुलढाणा आणि जळगांव इत्यादी जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असून महाराष्ट्रातील एकूण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा २९ टक्के वाटा आहे.

    महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांदा ह्या शेतीमालाच्या खरेदी – विक्रीसाठी माझ्या मतदारसंघातील लासलगांव बाजार समिती ही आशिया खंडात प्रसिध्द अशी बाजारपेठ आहे. येथे विक्रीस येणाऱ्या एकूण आवकेपैकी ८५ ते ९० टक्के आवक ही कांदा ह्या शेतीमालाची असते. सर्वसाधारणपणे हा कांदा नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार व औरंगाबाद या सहा जिल्ह्यातून विक्रीस येतो. आलेल्या कांदा आवकेपैकी ७० ते ८० टक्के कांदा हा निर्यातयोग्य असतो. नाशिक जिल्ह्यातील लासलगांवसह इतर सर्व बाजार समित्या या प्रायमरी मार्केट असल्याने येथे फक्त शेतकरी बांधवांचाच शेतीमाल विक्रीस येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळं कांदा बाजारभावातील होणारी घसरण यावर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.