Online fraud of 1.5 lakhs of young man due to PAN card update

त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. ज्यामध्ये जर तुम्ही पॅन कार्ड अपडेट केले नाही तर तुमचे खाते बंद करण्यात येईल. त्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा, असे लिहिले होते. दरम्यान फिर्यादी राजेंद्र यांनी लिंक उघडली असता त्यांच्या एसबीआय खात्यातून सुरुवातीला ९९ हजार ९९८ रुपये, व त्यानंतर २४ हजार ९९५ तसेच ३० हजार रुपये असे तीन वेळा एकूण १ लाख ५४ हजार ९९४ रुपये खात्यातून डेबिट (Debit from account) झाले.

    यवतमाळ : पॅन कार्ड अपडेटचा (PAN Card Update) बहाना करून एका तरुणाची एक लाख ५४ हजार ९९४ रुपयांनी ऑनलाइन फसवणूक (Online fraud) करण्यात आली. ही घटना १० ऑगस्टला पुसद तालुक्यातील राजना येथे उघडकीस आली. राजेंद्र नामदेव राठोड (२८) राहणार राजना तालुका पुसद (Taluka Pusad )असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी हे घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. ज्यामध्ये जर तुम्ही पॅन कार्ड अपडेट केले नाही तर तुमचे खाते बंद करण्यात येईल. त्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा, असे लिहिले होते.

    दरम्यान फिर्यादी राजेंद्र यांनी लिंक उघडली असता त्यांच्या एसबीआय खात्यातून (SBI account) सुरुवातीला ९९ हजार ९९८ रुपये, व त्यानंतर २४ हजार ९९५ तसेच ३० हजार रुपये असे तीन वेळा एकूण १ लाख ५४ हजार ९९४ रुपये खात्यातून डेबिट (Debit from account) झाले. राजेंद्र यांनी यासंबंधी बँकेची संपर्क केला असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी १३ ऑगस्ट रोजी पुसद ग्रामीण पोलीस ठाणे (Pusad Rural Police Station) गाठून या प्रकरणी हरितकर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.