Online fraud of 99 thousand on the pretext of PAN card update

फिर्यादी हे एका खाजगी कंपनीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात. दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज (text message on mobile) आला. ज्यामध्ये तुमचे एसबीआय योनो अकाउन्ट आज बंद होणार आहे. पॅन कार्ड अपडेट करावे, त्याकरिता खालील सदर लिंक वर क्लिक करा (Click on the link), असे लिहिलेले होते.

    यवतमाळ : एसबीआय युनो अकाउंट (SBI UNO Account) आज बंद होणार आहे, पॅन कार्ड अपडेट (PAN card update) करा, असे सांगून एका इसमाची ९९ हजार ९९८ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक (Online fraud ) करण्यात आली. ही घटना आज लोहारा परिसरातील देवी नगर (Devi Nagar in Lohara area) येथे उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सुनिल पुंडलिकराव खारकर (४०) रा. देवी नगर दारव्हा रोड गुरुनानक किराणाचे मागे यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे एका खाजगी कंपनीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात. दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज (text message on mobile) आला. ज्यामध्ये तुमचे एसबीआय योनो अकाउन्ट आज बंद होणार आहे. पॅन कार्ड अपडेट करावे, त्याकरिता खालील सदर लिंक वर क्लिक करा (Click on the link), असे लिहिलेले होते.

    त्यावरून फिर्यादी यांनी सदर मँसेज मधील लिंकवर क्लीक करून एसबीआय योनो असे नमुद असलेल्या मेनुमध्ये जाऊन लॉग इन आयडी व पासवर्ड टाकला. त्यानंतर त्यांना ओटीपी असलेल्या दोन टेक्स्ट मेसेज आले. सदर ओटीपी एसबीआय योनोच्या मेन्यू मध्ये टाकले असता त्यांच्या एसबीआय बँक अकाउन्ट ९९ हजार ९९८.०९/- रूपये डेबिट झाल्याचा टेक्स्ट मॅसेज (Text message debited) आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे (Avadhutwadi Police Station) गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.