डोंबिवलीत ऑनलाईन लॉटरीचा खेळ, सरकारच्या करोडो जीएसटीची फसवणूक

ऑनलाईन लॉटरी म्हणजेच स्वतःच एक अँप बनवून राजश्री सारख्या मशीन बनवून संपूर्ण शहरामध्ये वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. या संपूर्ण अनधिकृत असून सरकारचा जीएसटी देखील बुडवत आहेत.

    ठाणे : डोंबिवली शहर आणि आसपास शहरातील ऑनलाईन लॉटरी सरकारची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये लाखो करोडोंचा जीएसटी बुडवून चालवत असलेले ललित पटेल, संदीप गायकवाड यांच्यावर स्थानिक पोलीस प्रशासन कधी कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

    ऑनलाईन लॉटरी म्हणजे काय?
    ऑनलाईन लॉटरी म्हणजेच स्वतःच एक अँप बनवून राजश्री सारख्या मशीन बनवून संपूर्ण शहरामध्ये वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. या संपूर्ण अनधिकृत असून सरकारचा जीएसटी देखील बुडवत आहेत. रोजंदारीवर काम करणारे कॉलेजमधील तरुण मंडळी आणि शिक्षाचालक यांच्या पूर्ण आहारी गेले आहेत. याच कारणामुळे अनेक कुटूंबे उध्वस्थ झाली आहेत. या व्यसनासाठी आजचा तरुण उद्याचं भविष्य असलेला तरुणवर्ग वाममार्गाने पैसे आणू लागला आहे.

    झटपट पैसा मिळावा म्हणून रोजंदारीवर काम करणारे आपली पूर्ण कमाई व्यसनात घालवतात. चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये गंभीर चर्चा झाली असताना देखील अजूनही हे धंदे रोजरोज चालू आहेत. यासंदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यात आली आहेत. डोंबिवली ही सुसंस्कृत नगरी आहे. अशाप्रकारचे समाजघटक धंदे चालू नयेत म्हणून स्थानिक प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.