शहरात फक्त २६९ खड्डे, ६४३२ पैकी ९६ टक्के खड्डे बुजविले; महापालिकेचा दावा

पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील रस्त्यांवर तब्बल ६४३२ खड्डे होते. यापैकी ६१६३ म्हणजे ९६ टक्के खड्डे बुजविले आहेत. शहरातील रस्त्यांवर आता केवळ २६९ खड्डे उरल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, आजही शहरातील विविध रस्त्यांवरील खड्यांमुळे २६९ च्या संख्येबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

  पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील रस्त्यांवर तब्बल ६४३२ खड्डे होते. यापैकी ६१६३ म्हणजे ९६ टक्के खड्डे बुजविले आहेत. शहरातील रस्त्यांवर आता केवळ २६९ खड्डे उरल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, आजही शहरातील विविध रस्त्यांवरील खड्यांमुळे २६९ च्या संख्येबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

  २८ नोव्हेंबरपर्यंत ६१६३ खड्डे बुजविण्यात यश

  शहर परिसरात दिवाळीपर्यंत पाऊस सुरू होता. यंदा पाऊस लांबल्याने शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. खड्यांमुळे विविध रस्त्यांवर लहान-मोठे अपघात झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. महापालिकेने आवश्‍यकतेनुसार डांबर, कोल्ड मिक्‍सने खड्डे भरले आहेत. इतर ठिकाणी मुरूम, खडी तसेच कॉंक्रिट वापरून खड्डे बुजविण्याचे काम देखील करण्यात आले आहे. त्यानुसार २८ नोव्हेंबरपर्यंत शहरातील ६१६३ खड्डे बुजविण्यात आले आहेत. सध्या शहरात फक्त २६९ खड्डे असल्याचा पालिकेचा दावा आहे.

  ‘अ’ प्रभागाच्या हद्दीत ४३२ खड्डे होते. त्यापैकी ४१० बुजविले. ‘ब’ प्रभागात ७७५ खड्डे होते. त्यातील ७२७ बुजविले. ‘क’ प्रभागातील १ हजार ३३९ पैकी १२७२ खड्डे बुजविले आहेत. ‘ड’ प्रभागात १२७२ पैकी १२४० खड्डे बुजविले आहेत. तर, ‘इ’ प्रभागाच्या हद्दीतील ४६९ पैकी ४५९ खड्डे बुजविण्यात आले. ‘फ’ प्रभागाच्या हद्दीतील ९७१ पैकी ९४० खड्डे बुजविले. ‘ग’ प्रभागातील ८२८ पैकी ७९७ खड्डे बुजविण्यात आले. तर, ‘ह’ प्रभागात ३११ पैकी २८७ खड्डे बुजविले. शहरात एकूण ६४३२ खड्डे होते. त्यापैकी ६१६३ खड्डे बुजविल्याचा प्रशानाचा दावा आहे.

  जूनपूर्वी शहरात २०४२ खड्डे होते. १ जून ते २८ नोव्हेंबरपर्यंत शहरात ६४३२ खड्डे होते. यापैकी ६१६३ खड्डे बुजविले आहेत.

  -मकरंद निकम, शहर अभियंता.