सूरतमध्ये समजावयला गेलेले शिवसेनेचे आमदारच शिंदे गटात सामील…

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे आणखी तीन आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांना मनवायला गेलेले मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार रविंद्र फाटकही गुवाहाटीतील हॉटेलवर पोहोचणार असल्याची माहिती आहे.

    मुंबई : विधान परिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे  सुरतनंतर आता जवळपास 44 आमदारांना घेऊन गुहावटीत येथे थांबले आहेत.

    अशातचं शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे आणखी तीन आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांना मनवायला गेलेले मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार रविंद्र फाटकही गुवाहाटीतील हॉटेलवर पोहोचणार असल्याची माहिती आहे.

    कृषीमंत्री दादा भूसे आणि माजी वन मंत्री संजय राठोड हे आमदार मुंबईहून गुवाहाटीसाठी रवाना झाले आणि त्यांच्यासोबत आमदार रविंद्र फाटकही असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे सूरतला गेले. एकनाथ शिंदे यांना मनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मिलिंदे नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे सूरत गेले. त्यांच्यात एक तास चर्चाही झाली.

    दरम्यान यानंतरही एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली नाही. आता तर त्यांना समजावयाला गेलेले रविंद्र फाटकच गुवाहाटीत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेचे आणखी तीन आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.