दौंड तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री; तरुणाईच्या व्यसनाने पालकांमध्ये काळजी

दौंड तालुक्याच्या सर्वच गल्लीबोळात गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने तरुणवर्ग व्यसनाधीन होत चालला आहे. ही गंभीर बाब असून यामुळे कॅन्सरसारख्या भयंकर आजाराने तरुणांना सध्या विळखा घातला आहे. दौंड तालुक्यात प्रत्येक गावात फिरून गुटखा विक्री खुलेआम चालू आहे. यासाठी गुटखा विक्री करणाऱ्या ठेकेदारांना पोलिसांनी वेळीच आळा घालावा, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

  वरवंड : दौंड तालुक्याच्या सर्वच गल्लीबोळात गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने तरुणवर्ग व्यसनाधीन होत चालला आहे. ही गंभीर बाब असून यामुळे कॅन्सरसारख्या भयंकर आजाराने तरुणांना सध्या विळखा घातला आहे. दौंड तालुक्यात प्रत्येक गावात फिरून गुटखा विक्री खुलेआम चालू आहे. यासाठी गुटखा विक्री करणाऱ्या ठेकेदारांना पोलिसांनी वेळीच आळा घालावा, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
  दौंड तालुक्यातील केडगाव ही मोठी बाजारपेठ आहे. त्यालगत असणाऱ्या इतर गावांमध्ये अगदी कमी वयात तरुणवर्ग गुटखा, तंबाखू, सिगारेट यामुळे व्यसनाधीन बनला आहे. केमिकलयुक्त या गुटख्यामुळे कॅन्सर होण्याची भीती दिवसेंदिवस वाढली आहे. तरुणाईला लागलेले गुटख्याच्या या व्यसनामुळे पालकांमध्ये काळजी व चिंतेचे वातावरण बनले आहे. या तरुणाईला व्यसनाधीन करण्याचे पाप गुटखा विक्रेत्यांनी करू नये, अशी मागणी सुज्ञ पालक करत आहेत.
  गुटखा विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी
  ठिकाणाहून या गुटख्याची विक्री केली जाते. त्याचबरोबर वरवंड, पारगाव, चौफुला, यवत, पाटस,अशा ठिकाणी हा गुटखा दुचाकी व चारचाकी वाहनांद्वारे पोहोचवला जातो. केडगावची बाजारपेठ मोठी असल्याने येथे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो. गुटखा विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने तरुणांना गुटखा सहज उपलब्ध होत आहे. यामुळे तरुणाईला गुटख्याची पिचकारी मारणे सध्या सोपे झाले असल्याचे चित्र आहे.
  पोलिसांचे दुर्लक्ष
  केडगाव व इतर गावांत गुटखा विक्री खुलेआम होत असून पानटपरी, किराणा दुकान, हॉटेल अशा ठिकाणी गुटखा विक्री सध्या जोमाने चालू आहे. यावर कारवाई कधी होणार? या व्यसनात तरुणवर्ग यात अडकत चालला आहे. पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अन्न प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडून गुटखा विक्री व ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.