राज्यात मराठा आणि ओबीसी समाज भिडवण्याचे कामकाज सुरू; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर राजकारण तापलेले असताना प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस आरएसएसचे साधे प्रांतप्रमुखदेखील होऊ शकले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

  सांगली : गेली अनेक दिवसांपासून मराठा समाजाचा मुद्दा अनेक दिवसांपासून राज्यात पेटलेला असताना, मनोज जरांगे यांचा राज्यभर दौरा सुरू आहे. असे असताना प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळांना मोठा टोला लगावत दोन समाजात तेढ निर्माण करीत असल्याचे सांगितले होते. आता त्यांनी सरळसरळ सरकारमधील मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरमराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा हा अंतर्गत असून निजाम मराठा विरुद्ध रयत मराठा असा हा संघर्ष सुरू असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अदृश्य शक्ती मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Maratha and OBC) यांनी केला. ते आज सांगलीमध्ये बोलत होते.

  राज्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू असलेल्या एकमेकांवर टीकेवरून आंबेडकर यांनी सर्वच नेत्यांना राजकीय नीतीमत्ता पाळण्याचा सल्ला दिला. येत्या 3 डिसेंबर रोजी चार राज्यांचा निकाल येईल,त्यानंतर 6 डिसेंबरनंतर अयोध्यामधून नवी मोहीम सुरू होईल, असे विधान करत राज्यात दंगली होतील, असा अलर्टनेस प्रत्येक पोलिस ठाण्याला मिळाला असल्याचा पुनरुच्चार आंबेडकर यांनी केला आहे.

  देवेंद्र फडणवीस आरएसएसचे प्रांतप्रमुखही होऊ शकले नाहीत
  प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस आरएसएसचे साधे प्रांतप्रमुख देखील होऊ शकले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीका करताना केंद्राकडून अपरिपक्व धोरण राबवले जात असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. केंद्राच्या अग्नीवीर योजनेवर आंबेडकरांनी निशाणा साधत अग्नीवीर योजना भारतीय सैन्य दलाचे मनोबल कमी करणारे असून ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

  राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या हमीभावाचा कायदा केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सक्ती देखील केली जाईल,असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुरु असलेल्या वादावरून मंत्री छगन भुजबळ यांना आंबेडकर यांनी सल्ला दिला. ओबीसींसाठी त्यांनी राजकीय पक्ष काढावा, असे त्यांनी सांगतले.