विरोधक एकही जागा जिंकू शकत नाही, भाजप नेते दिनेश शर्मा यांचे मोठे विधान

राम आणि आंबेडकरांचा विराेध करणाऱ्या काँग्रेस सोबत आहेत. उद्धव यांची शिवसेना यांनी रामनामाची नकली वस्त्रे परिधान केली होती.

    कल्याण : राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांनी स्वत: म्हटले आहे की, बाळासाहेबांचे सिद्धांत भाजपचे मोदी पूर्ण करीत आहेत. त्यामुळे मनसेने मनसे समर्थन दिले आहे. त्यामुळे त्यांचे मी त्यांना मनसे धन्यवाद देतो असे भाजपचे लाेकसभा प्रभारी दिनेश शर्मा यांनी सांगितले. भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या प्रचारासाठी सुपर वॉरियर्स मेळावा कल्याण पश्चिमेतील वायले नगरातील साई हॉलमध्ये पार पडला. या प्रसंगी पत्रकार परिषदेत लोकसभा प्रभारी शर्मा यांनी उपरोक्त विधान केले.

    भाजपची लढाई कोणाशी नाही. भाजपसमोर विरोधक विखुरलेले आहेत. मी समजतो की, एनसीपी शरद पवार यांची लढाई शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसला नष्ट करण्यासाठी पुढे आले आहेत. तर काँग्रेस उद्धव ठाकरे यांना संपविण्याचे काम करीत आहे. विरोधकांकडे नियत निधी आणि नेतृत्व नाही. ४ जून नंतर सगळ्यात पहिले शिवसेना काँग्रेस वेगळी करेल. काँग्रेस पासून राष्ट्रवादी वेगळी होईल. हे तिन्ही पक्ष परस्परांचे सगळ्यात कट्टर विरोधक असतील असा दावा शर्मा यांनी केला आहे.

    महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि परिवार वादी यांच्यात निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात मोदी मॅजिक बोलत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक वातावरण आहे की, जनता निवडणूका लढवित आहेत. राजकीय पक्ष निवडणूका लढवित नाहीत. निवडणूकीची दोरी जनतेच्या हाती आहे. या निवडणूकीत पुन्हा मोदी लाट पूर्ण देशात असेल. महाराष्ट्रात एकही जागा विरोधकांनी जिंकली तरी त्यांचे मोठे यश असेल. विरोधकांची नकारात्मक मानसिकता आहे. विरोधी मोदी विरोधाच्या आधारे अपशब्द उच्चारले जातात. संजय राऊत हे मोदी आणि शहा यांना विनाशकारी म्हणतात. मी म्हणतो विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवसेना समर्थन करणारे संजय राऊत बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. राम आणि आंबेडकरांचा विराेध करणाऱ्या काँग्रेस सोबत आहेत. उद्धव यांची शिवसेना यांनी रामनामाची नकली वस्त्रे परिधान केली होती.

    विकासासाठी मोदीजींना मत द्या, विकासासाठी मोदीजींना पाठिंबा द्या, मुस्लिम मोहल्यातून माझ्यापर्यंत कोणी माणूस हे सांगायला आला नाही की आम्हाला ही विकास कामे पाहिजे. कोणी आल्याशिवाय त्यांच्या काय अडचणी आहे हे समजणार नाही. आम्ही जातिभेद धर्मभेद केला नाही. आम्ही त्या ठिकाणी काँक्रीट रस्त्यांचे कामं केली आहेत. आमच्या निदर्शनात आणून दिले तर तेही विकास काम करू मुस्लिम मोहल्यात दहा वर्षात काहीही काम झाले नाही या प्रश्नावर केंद्रीय पंचायत राज्यमंत्री व भिवंडी लोकसभाचे खासदार कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.