विरोधी पक्षनेते अजित पवारांना अविश्वास प्रस्ताव पत्राबाबात माहीत नसणं ही तांत्रिक बाब, संजय राऊतांची प्रतिक्रिया, पुढे म्हणाले…

पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याने चर्चांना उधाण आलं असून, पत्राबाबत आपणाला हे माहीत नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याने नार्वेकरांविरोधात हा अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांची प्रतिक्रया समोर आली आहे.

    नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्य पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक होत सरकारच्या विरोधात आंदोलन करताहेत. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी देखील विरोधकांनी मंत्री राजीनामा, राज्यपाल हटाव यासाठी आंदोलन केले. त्याआधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाचे पत्र विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे दिले आहे, मात्र या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याने चर्चांना उधाण आलं असून, पत्राबाबत आपणाला हे माहीत नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याने नार्वेकरांविरोधात हा अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांची प्रतिक्रया समोर आली आहे.

    दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, अविश्वास प्रस्तावाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवारांना माहित नसणं ही तांत्रिक बाब असल्याचं आज शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) म्हणत, त्यांनी या मुद्द्यावरून सारवासारव केली आहे. तसेच विरोधी पक्षांना सभागृहात बोलू दिलं जात नाही या मुद्द्यावरून मविआ काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Chairmen Rahul Narvekar) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव (Motion of No Confidence) सादर केला. मात्र, याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना माहितीच नसल्यांच अजित पवार यांनी म्हटलं. यावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून, तर्क-वितर्क काढले जातहेत. तसेच चर्चाना उधाण आलं आहे.

    राज्यपाल हटावसाठी विरोधक आक्रमक…

    दरम्यान, आज शेवटच्या दिवशी देखील विरोधक आक्रमक होत, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत, राज्यपाल हटावाचे हातात फलक घेत आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या राजीनामा घ्या…राज्यपाल हटाव…अशी घोषणाबाजी करत विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. तसेच भ्रष्ट व घोटाळेबाज मंत्री यांचेही राजीनामे घ्या अशी विरोधकांनी मागणी केली. यावेळी महाविकास आघाडी सरकरामधील सर्व आमदार उपस्थित होते.