ड्रग्जप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी

शिंदे औद्योगिक वसाहतीत ड्रग्ज बनवण्याचा कारखाना (Nashik Drugs Factory) उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर नाशिक पोलिस सर्वाच्याच रडारवर आहेत. सोमवारी (दि. १६) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीदेखील नाशिक पोलिसांवर निशाणा साधला.

    नाशिक : शिंदे औद्योगिक वसाहतीत ड्रग्ज बनवण्याचा कारखाना (Nashik Drugs Factory) उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर नाशिक पोलिस सर्वाच्याच रडारवर आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीदेखील नाशिक पोलिसांवर निशाणा साधला.

    ड्रग्ज कारखान्याची माहिती मुंबई पोलिसांना समजते; पण नाशिकच्या पोलिसांना नाही ? यामागचे कारण काय ? पूर्वी गांजाची शेती व्हायची आता थेट ड्रग्जचे कारखाने चालवले जात आहेत. ड्रग्जप्रकरणी अधिकाऱ्यांकडून पाळेमुळे खोदण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, सरकार साथ देत नाही. पोलिस प्रशासनाने ड्रग्जप्रकरणाची आठवड्यात खोलवर चौकशी करावी. अन्यथा याविरोधात शिवसेना मैदानात उतरुन भूमिका घेईल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.

    नाशिक येथे दानवे आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जरांगे पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाष्य केले. मनोज जरांगे यांना ४० दिवसांचे आश्वासन दिले हे सरकार कसे पाळते? हे लवकरच दिसेल.

    जरांगे पाटील यांच्या मागणीचा विचार व्हावा, आमचीही तीच भूमिका असल्याचे दानवे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, बोरवणकर या जबाबदार अधिकारी आहेत. त्या सांगत असतील तर सरकारने चौकशी करावी. मात्र, कुंपनच शेत खात असेल तर असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.