कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा भूमिकेचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला निषेध 

चाळीसगाव काय चाळीस इंच जमीन सुद्धा कर्नाटकला महाराष्ट्राची देणार नाही. तेथील जनतेची जाऊन चर्चा करणार, यासाठी योग्य ती पावले उचलण्यासाठी सरकारसोबत चर्चा करू. मेहबुबा मुफ्तीसोबत भेटणाऱ्या व बसणा-यांनी शिवसेनेला राजनीती शिकवू नये. असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलं.

    मुंबई – सध्या सीमाप्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे, मात्र कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीतील काही गावांवर आपला दावा केला आहे. यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येत आहेत. दरम्यान, यावर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची (Ambadas Danve) प्रतिक्रिया समोर आली आहे. सीमा बेळगाव प्रश्नी कर्नाटक सरकार आग लावण्याचं प्रयत्न करत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पंतप्रधान व गृहमंत्र्यांना सीमा प्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार असल्याच ठरलं आहे.

    दरम्यान, चाळीसगाव काय चाळीस इंच जमीन सुद्धा कर्नाटकला महाराष्ट्राची देणार नाही. तेथील जनतेची जाऊन चर्चा करणार, यासाठी योग्य ती पावले उचलण्यासाठी सरकारसोबत चर्चा करू. मेहबुबा मुफ्तीसोबत भेटणाऱ्या व बसणा-यांनी शिवसेनेला राजनीती शिकवू नये. तेजस्वी यादव व शिवसेना नेते आदित्य ठाकरे या दोन्ही तरुण नेतृत्वांच्या भेटीच स्वागत केलं पाहिजे, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलं.