पक्ष स्थापन करणे व चालवणे हे फार जिकिरीचे काम; छत्रपती संभाजीराजेंच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया 

छत्रपती संभाजीराजे यांना स्वराज्य या संघटनेच्या माध्यमातून पक्ष काढायचा असेल व त्यामार्फत राजकीय बेस बनवण्याची त्यांची भूमिका असू शकते. संघटना संभाजीराजे यांची आहे, पक्षही संभाजीराजेंचा आहे, भविष्यात कसे जायचे आहे हे ते ठरवणार आहेत. जी गोष्ट त्यांची आहे व त्यांच्याशी निगडीत आहे त्याबद्दल मी भाष्य करणे उचित ठरणार नाही. तथापि पक्ष काढणे, चालवणे हे फार जिकिरीचे काम असते, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली. खासदार संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्ष स्थापनेची घोषणा केली. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रसार माध्यमांशी बोलत होते(Opposition Leader Pravin Darekar's reaction to Chhatrapati Sambhaji Raje's decision).

    मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांना स्वराज्य या संघटनेच्या माध्यमातून पक्ष काढायचा असेल व त्यामार्फत राजकीय बेस बनवण्याची त्यांची भूमिका असू शकते. संघटना संभाजीराजे यांची आहे, पक्षही संभाजीराजेंचा आहे, भविष्यात कसे जायचे आहे हे ते ठरवणार आहेत. जी गोष्ट त्यांची आहे व त्यांच्याशी निगडीत आहे त्याबद्दल मी भाष्य करणे उचित ठरणार नाही. तथापि पक्ष काढणे, चालवणे हे फार जिकिरीचे काम असते, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
    खासदार संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्ष स्थापनेची घोषणा केली. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रसार माध्यमांशी बोलत होते(Opposition Leader Pravin Darekar’s reaction to Chhatrapati Sambhaji Raje’s decision).

    महाराष्ट्रात कुणालाही कुठलीही संघटना काढण्याचा अधिकार आहे. अनेक नेत्यांनी अशा संघटना काढल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वाभिमान संघटना काढली. भाजपचे नेते गणेश नाईक यांनी शिवशक्ती संघटना काढली, असे दरेकर यांनी सांगितले.

    छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपचा मतांचा जो कोटा आहे, त्यामधील भाजपची मते छत्रपती संभाजीराजे यांना देण्यासंदर्भात महाराष्ट्रातील आमचे शीर्षस्थ नेते देवेंद्रजी फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील हे केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करतील व त्यानंतर पक्ष योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.