Marathas oppose OBC reservation ordinance; Maratha Kranti Morcha warns to go to court

13 सप्टेंबर रोजी, म्हणजे आजपासून सकाळी दहा वाजता शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्य सरकारसमोरील या आरक्षणावर कसा तोडगा काढायचा हे आव्हान आहे.

   छत्रपती संभाजीनगर सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागील १६ दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) हे उपोषणला बसले आहेत. जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटताहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, आणि याबाबत राज्यभर मोर्चे, आंदोलन सुरु असताना, आता राज्यात ओबीसी समाज देखील आरक्षणावरुन आक्रमक झाला असून, ओबीसी समाजाने अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळं छत्रपती संभाजीनगर येथे आजपासून ओबीसी समाजाने अन्नत्याग आंदोलन करणार आहे. (opposition to giving reservation to maratha community from obc coordinating committee in chhatrapati sambhajinagar food sacrifice movement from today what are the demands)

  आजपासून अन्नत्याग आंदोलन

  दरम्यान, राज्यातील मागील १६ दिवसांपासून आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा गाजत असताना, आणि राज्यभर आंदोलन, मोर्चे निघत असताना, दुसरीकडे आता ओबीसी (OBC) देखील रस्त्यावर उतरणार आहेत. ओबीसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध होत असून, ओबीसी समन्वय समितीने यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला. 13 सप्टेंबर रोजी, म्हणजे आजपासून सकाळी दहा वाजता शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्य सरकारसमोरील या आरक्षणावर कसा तोडगा काढायचा हे आव्हान आहे.

  दरम्यान, ओबीसी समन्वय समितीच्या वतीने माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधील समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. ओबीसींच्या विविध मागण्या आणि ओबीसींवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात चर्चा झाली. तसेच आंदोलनाची दिशा ठरली.

  काय आहेत मागण्या?

  • सर्व जातीची जातनिहाय जन- गणना त्वरित करावी
  • मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये.
  • ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. ती त्वरित चालू करावी
  • आजतागायत मराठा समाजाला कुणबी (ओबीसी) म्हणून दिलेली जातींची प्रमाणपत्रे रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
  • ओबीसी, (व्हिजेएनटी, एसबीसी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी