अकोल्यात ३ दिवसांची संचारबंदी लागू करण्याचे आदेश, वाचा काय असतील नियम?

अकोट फाइल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नायगाव परिसरामध्ये किरकोळ वाद झाला होता. या घटनेनंतर मात्र मोठ्याप्रमाणात अफवा पसरल्या होत्या. परिणामी, खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाकडून संचारबंदी व जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आली आहे.

  अकोला (Akola) : अकोला जिल्ह्यातील अकोट नंतर अकोला शहरात आजपासून संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी काढले आहेत. शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सकाळी सहा ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी आणि सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश काढले आहेत.

  देशमुखांच्या अटकेवर पवारांचं मोठं विधान; ‘तुरुंगातील प्रत्येक तासाची…’
  दरम्यान, अकोला शहरामध्ये अमरावती पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान, अकोट फाइल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नायगाव परिसरामध्ये किरकोळ वाद झाला होता. या घटनेनंतर मात्र मोठ्याप्रमाणात अफवा पसरल्या होत्या. परिणामी, खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाकडून संचारबंदी व जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आली आहे.

  अकोट शहरात सध्या शांतता आहे . मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नये त्यासाठी अकोट शहरातील गेले दोन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अमरावती शहरात त्रिपुरा घटनेसंदर्भात तणावपूर्ण परिस्थिती होऊन बंदला हिंसक वळण लागले होते . त्यानंतर अमरावती शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने अकोला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार किव्हा हिंसक वळण लागू नये त्यासाठी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

  संपूर्ण शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी १७ नोव्हेंबर दुपारी बारा वाजतापासून ते २० नोव्हेंबरचे सकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत जमाबंदी व संचारबंदी बाबत आदेश लागू करण्यात आले आहे. अकोला शहरामध्ये सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जमावबंदीचा कालावधीत सार्वजनिक ठिकाणी चार किंवा चार पेक्षा जास्त व्यक्तीच्या जमावास प्रतिबंध आहे.

  विधान परिषद निवडणूक होऊ घातल्या आहेत त्याच संदर्भातील नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी फक्त सूट राहील. संध्याकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्यविषयक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालय आवश्यक कामासाठी सुरू राहतील. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. अकोट शहरात सध्या शांतता आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला नसल्याचे माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.