प्रवाशांना झालेल्या गैरसोयीप्रकरणी रेल्वे प्रवाशाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश; तब्बल साडेतीन वर्षांनंतर आला निकाल

रेल्वे विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तब्बल साडेतीन वर्षांनंतर निकाल देत रेल्वेला 15 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

    अमरावती : रेल्वे विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तब्बल साडेतीन वर्षांनंतर निकाल देत रेल्वेला 15 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

    तक्रारदार, नितेंद्र कुंवरचंद जैन (रा. श्रीराम कॉलनी, अकोली रोड) हे शासकीय विभागात लिपिक आहेत. ते आपल्या कुटुंबासमवेत 16 मार्च 2020 रोजी नवीन अमरावती (अकोली रोड) रेल्वे स्थानकावरून बडनेरा-नरखेड मेमू पॅसेंजर ट्रेनने सकाळी 5.45 वाजता नरखेडला निघाले. ट्रेन 6.29 ला चांदूरबाजार स्टेशनला पोहोचली. येथे ट्रेनचा थांबा केवळ 1 मिनिटाचा असला तरी, येथे गाडी विनाकारण सुमारे 2.30 तास थांबली आणि नंतर 9 वाजता निघाली.

    त्यामुळे नितेंद्र जैन यांना तातडीने दुसऱ्या ट्रेनमध्ये आरक्षण करावे लागले. त्यांना झालेल्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक गैरसोयीची तक्रार त्यांनी 5 नोव्हेंबर 2020 रोजी ग्राहक मंचात दाखल केली. खंडपीठासमोर अॅड. प्रवीण जैन यांनी आपली बाजू मांडली. ज्यावर ग्राहक मंचाने 18 मार्च रोजी अंतिम आदेश दिला.