स्वराज्य रणरागिणी महिला संस्थेच्या विद्यमाने महिला क्रिकेट सामन्यांचे आयोजन

ठाणे जिल्ह्यातून महिला क्रिकेट सामन्यासाठी नोंदणी येत होत्या. महिलांच्या 9 टीम घेऊन 11 सामने दिवसभर भरविण्यात आले.

    कल्याण : ठाणे जिल्ह्यात प्रथमच महिलांकडून, महिलांसाठी भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. टिटवाळ्यातील मुली, महिलांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाता यावे तसेच या क्षेत्रात ही आपले करियर करता यावे या प्रेरणेतून स्वराज्य रणरागिणी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया आचरेकर यांनी हे क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून प्रथमच २०२२ मध्ये टिटवाळा शहरांमध्ये महिला फॅशन शो आयोजित करण्यात आलेला होता. त्या उत्स्फूर्त यशानंतर महाराष्ट्र दिनी भरविण्यात आलेल्या महिला क्रिकेट मॅच हा उपक्रम ही यशस्वीपणे पार पडला.

    व्यवस्थापक टीम मध्ये चारुशीला मंचरक, समृध्दी सावंत, शीतल खोकले, अस्मिता शाह, मालिनी मगर, अर्चना जोशी, उज्वला भोईर, वैशाली मालुसरे, किशोर मगर, संदीप वराडकर, शेखर जोशी, मिलिंद सावंत, उमेश शाह, लक्ष्मण मंचरकर, सिध्देश सावंत आणि संदीप आचरेकर यांनी व्यवस्थापक म्हणून चोख भूमिका बजावली. यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

    ठाणे जिल्ह्यातून महिला क्रिकेट सामन्यासाठी नोंदणी येत होत्या. महिलांच्या 9 टीम घेऊन 11 सामने दिवसभर भरविण्यात आले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अण्णा तरे, सुहास कांबळे, ह्युमन केअरचे अध्यक्ष कमलेश नागरे, पोलीस महिला दक्षता कमिटी टिटवाळा हिराताई कांबळे, तृप्ती गायकवाड, प्रमोद नांदगावकर, वैदेही नांदगावकर, 2022 फॅशन शो विजेती वैदेही खिस्मतराव, राजेश दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.

    निवेदक तुषार वैद्य, मनीषा अग्निहोत्री, पंच अभिजित कडव, संदीप वराडकर, राहुल जबडे आणि संदीप आचरेकर यांनी आपली जबाबदारी चोख बजावली. स्वराज्य रणरागिणी महिला संस्था आयोजित TPL महिला क्रिकेट 2024 मध्ये 9 संघामधून डोंबिवली ड्रीमर्स प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले. त्यांना चषक व ११००१/- रुपये रोख देऊन गौरवण्यात आले. द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरले मनिकर्णिका टीम. त्यांना चषक व ६००१/- रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तृतीय पारितोषिक शिवकन्या टीम रोख रक्कम २५०१/- पारितोषिक देण्यात आले. सर्व सहभागी महिला खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.