श्री सेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगाव येथे बँड स्पर्धेचे आयोजन

परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेतील उपक्रमामध्ये 'राज्यस्तरीय बँड महोत्सव' आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीने होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात बँड पथकाच्या सहभागाने 15 जानेवारी रोजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये राज्यातील औरंगाबाद,बीड, पुणे,सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व कर्नाटक मधील बॅन्ड पथके सहभाग घेत असताना हजारो कलाकारांच्या उपस्थितीमध्ये " बॅन्ड महोत्सव " संपन्न होणार आहे.

    वर्धनगड : यावर्षी परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेतील उपक्रमामध्ये ‘राज्यस्तरीय बँड महोत्सव’ आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीने होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात बँड पथकाच्या सहभागाने 15 जानेवारी रोजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये राज्यातील औरंगाबाद,बीड, पुणे,सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व कर्नाटक मधील बॅन्ड पथके सहभाग घेत असताना हजारो कलाकारांच्या उपस्थितीमध्ये ” बॅन्ड महोत्सव ” संपन्न होणार आहे.त्यामध्ये उपस्थितीत बँड पथका ना श्री सेवागिरी चषक प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर उत्कृष्ट वैयक्तिक कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे. याचा सर्व बँड कला प्रेमींनी व कलाकारांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव व प्रा .अशोकराव जाधव ( प्रदेशाध्यक्ष- बँड बँजो चालक कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य ) यांनी केले आहे.

    सदर महोत्सवांमध्ये राज्यातील नामांकित बँड सहभागी होत असताना त्यांच्या सादरीकरणाचे नियम असे आहेत 1) प्रत्येक बँड पार्टीने पाच गाणी सादर करत असताना पैकी दोन गाणी गायक व इलेक्ट्रॉनिक स्वाध्याय वाजवणे व तीन गाणी पारंपरिक ब्रास बँड वरती वाजवणे 2) संच कमीत कमी दहा लोकांचा व जास्तीत जास्त कितीही कलाकारांचा असला तरी चालेल परंतु तो आकर्षक ड्रेस कोड मध्ये असावा.3) शिस्तप्रिय सादरीकरणाची आयोजकाकडून दखल घेऊन त्यांना सन्मानित केले जाईल.4) पाच गाण्यांमध्ये क्लासिकल गीत भावगीत लावणी भक्ती गीत आणि युवा पिढीच्या आवडीचे एक गीत सादर करावे. तरी सदर या स्पर्धेचा या नियमाप्रमाणे भाग घेऊन सहकार्य करून राज्यस्तरीय बँड स्पर्धेची शोभा वाढवावी असे आवाहन देवस्थान ट्रस्ट चेअरमन रणधीर जाधव व बँड बँजो चालक कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अशोकराव जाधव यांनी केले आहे.