विजयादशमीनिमित्त आळंदी रोडवरील साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

  पिंपरी : विजयादशमी आणि श्री साईबाबा यांची पुण्यतिथीनिमित्त आळंदी रोड येथील साई मंदिरामध्ये आजपासून ( दि. २३) ते गुरुवारपर्यंत ( दि. २६ ) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा मंदिरचे विश्वस्त व अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी दिली.

  कलाकारांचा कार्यक्रम होणार

  साईबाबा मंदिरात उद्या (मंगळवारी) विजयादशमीच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनईवादन, मंगल स्नान, श्रींची आरती व श्रीसाईचरित अखंड पारायण सांगता सोहळा, श्रींचे रुद्राभिषेक, भिक्षा झोळी, श्री साईबाबा भजन कार्यक्रम, श्रींची मध्यान्ह आरती, श्रींचे नामस्मरण , श्रींची प्रार्थना व दिपज्योत, सीमोल्लंघन व मिरवणूक, श्रींची पालखी, श्री हरी जागर आदी कार्यक्रम होणार आहेत. तर सायंकाळी 7.30 वाजता निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे.

  श्रींची शेजारती होणार

  तर बुधवारी ( दि. 25 ) पहाटे 5.45 वाजता श्रींचे मंगलस्नान, श्रींची आरती, मध्यान्ह आरती, धुपारती, शेजारती होणार आहे. गुरुवारी २६ ऑक्टोबरला सांगता समारोप दिवशी पहाटे 5.15 वाजता काकड आरती, मंगल स्नान, आरती, श्री गोपालकाला, श्रींची मध्यान्ह आरती, श्रींची धुपारती, श्रींची पालखी, श्रींची शेजारती होणार आहे.

  गुरुवार पर्यंत मंदिर 24 तास खुले राहणार

  विजयादशमी आणि श्री साईबाबा यांची पुण्यतिथी निमित्त मंदिर मंगळवार ( दि. 24) पासून गुरुवार (26 ऑक्टोबर) पर्यंत भाविकांना रात्रभर पारायणसाठी ,दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी दिली.