जलजीवन मिशनअंतर्गत जाणीव जागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन : मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे

शालेय स्तरावर निबंध , चित्रकला व महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा

    सोलापूर : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे महत्व व जलसंवर्धन या विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी या उद्देशाने शालेय स्तरावर जिल्हा व तालुकास्तरीय निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.

    जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल देण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर सुरु आहेत.पिण्याचे पाणी , पाणी पुरवठा योजना , योजनेमध्ये लोकसहभाग , पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाले नंतर योजनेची देखभाल तसेच योजना शाश्वत राहण्यासाठी पाणीपट्टी वसुली व स्रोत बळकटीकरणासाठी जल संवर्धन याचे महत्व विद्यार्थी दशेपासूनच रुजावे व त्यांच्यात पाण्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी जलशक्ती मंत्रालय , भारत सरकार व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात आयोजित करण्यात आल्या आहेत.निबंध स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन,पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन.माझ्या गावातील पाणी पुरवठा.जल जीवन मिशन व माझ्या गावाचा विकास. जलसंवर्धन काळाची गरज हे विषय देण्यात आले आहेत.दोन्ही गटातील निबंधाची शब्दमर्यादा १५०० इतकी असून वेळ ४० मिनिटांचा राहणार आहे.

    चित्रकला स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा,जल हेच जीवन , माझ्या गावातील पाणी पुरवठा, जल संवर्धन व पाण्याचे महत्त्व,पाण्याचे वितरण व करप्रणाली,पाणी पुरवठा योजनेतील लोकसहभाग, पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती हे विषय राहणार आहेत.शालेय स्तरावरून प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तालुका स्तरावर एकत्रित करून तालुकास्तरावर १ ते ३ क्रमांक निवडले जातील.तालुकास्तरावरुन प्राप्त स्पर्धकांतून प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत.दोन्ही गटात प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणा-या विद्यार्थ्यांना अनुक्रमे २१,०००/- , ११,०००/- व ५,५०० / – रूपये रोख बक्षीस , सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .

    महाविदयालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन,पाणी आडवा पाणी जिरवा,जल हेच जीवन , माझ्या गावातील पाणी पुरवठा पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती जल संवर्धन.या वक्तृत्व स्पर्धामध्ये उच्च माध्यमिक (११ वी व १२वी) महाविदयालयीन (पदवीधर) विदयार्थी सहभागी होऊ शकतात.उच्च माध्यमिक (११ वी, १२ वी) महाविदयालयीन स्तरावरून प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तालुकास्तरावर एकत्रीत करून तालुकास्तरावर १ ते ३ क्रमांक निवडले जातील.तालुकास्तरावरून प्राप्त स्पर्धकांतून प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत.जिल्हास्तरावर दोन्ही गटात प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणा-या विद्यार्थ्यांना अनुक्रमे २१,०००/- , ११,०००/- व ५,५००/ – रूपये रोख बक्षीस , सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .

    निबंध स्पर्धा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक शाळांनी व उच्च माध्यमिक व (११ वी व १२ वी) तसेच वरिष्ठ महाविदयालयांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण पाटील, प्र.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रसाद मिरकिले, प्र.शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) तृप्ती अंधारे यांनी केले आहे.