..अन्यथा दसऱ्याला फुलाऐवजी मटक्याचे तोरण बांधले जाईल!

खेड-प्रतापसिंहनगर येथील जुगार, दारू व मटका क्लब सुसंस्कृतीमुळे तरुण पिढीला धोका आहे.तेव्हा तो संबंधितांनी बंद करावा.अन्यथा,दसऱ्यास झेंडूच्या फूलाऐवजी मटक्याचे तोरण बांधले जाईल.

    सातारा : खेड-प्रतापसिंहनगर येथील जुगार, दारू व मटका क्लब सुसंस्कृतीमुळे तरुण पिढीला धोका आहे.तेव्हा तो संबंधितांनी बंद करावा.अन्यथा,दसऱ्यास झेंडूच्या फूलाऐवजी मटक्याचे तोरण बांधले जाईल.

    कोरेगांव रस्त्यावरील खेड-प्रतापसिंहनगर येथील रहिवाश्यांनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाची कास पकडली आहे. एकेकाळी गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या या नगरात आज विविध ठिकाणी कर्तबगारी पिढी घडत आहे. असे असताना जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळे जुगार व क्लब संस्कृती फोफावत आहे.त्यामुळे तरुण पिढी धोक्यात आल्याची चिंता पालक वर्ग व्यक्त करीत आहेत.१९७२ व त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता.जगण्याचे साधनही नव्हते. त्यामुळे बीड,उस्मानाबाद,लातूर,नगर, परभणी,जालना,सोलापूर,मराठवाडा आदी ठिकाणाहून काही बांधव उदनिर्वाहासाठी सातारा शहरालगत आले होते. छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहराने त्यांना सामावून घेऊन मोकळ्या माळरानावर प्रतापसिंहनगर वस्ती निर्मिती झाली होती. पूर्वी मोठ्या प्रमाणात बिगारी,कारागीर व भंगार व्यवसाय तसेच रोजंदारी वरती काम करणारे शेतमजूर कष्टकरी यांचा पुरवठा या नगरातून होत होता.आता मात्र,मटका जुगार,दारु,क्लब यामुळे तरुण पिढी बरबाद होऊ लागली आहे. राजकारणाशी संबंधित लोक दोन नंबरचा व्यवसाय करून पिढी बरबाद करीत आहेत. काहींनी या धंद्याला कंटाळून प्रतापसिंहनगर सोडून पुणे गाठले आहे. त्यानांही प्रतापसिंहनगर मधील दोन नंबरचे व्यवसायाचा कंटाळा आलेला आहे. जर हे धंदे तसेच चालु करायचे असतील तर प्रतापसिंह नगरचे नाव बदलून मटका नगर करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ओव्हाळ,दिपक जाधव,उमेश गायकवाड,दादा गायकवाड,अजित गायकवाड,राकेश जाधव,यशवंत घोडेस्वार,गौतम चंदनशिवे,उत्तरेश्वर ओव्हाळ,आकाश गायकवाड,अतुल गरड आदींनी केलेली आहे. याबाबतची निवेदन व्यवसाय बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेली असून निवेदनाची पोहोचही घेतलेली आहे. जर आठ दिवसात सर्व व्यवसाय बंद झाले नाही तर दसऱ्याला झेंडूच्या फुलाऐवजी मटक्याच्या चिठ्ठ्यांचे तोरण बांधून आंदोलन केले जाईल असा गर्भित इशारा देण्यात आला आहे.