..अन्यथा थेट मुख्यमंत्र्यांना काळे फासू; शिवसेनेच्या महिला नेत्याचा ईशारा

आता अति होत आहे, त्यामुळे शहरातून कोणी नगरसेवक फुटल्यास त्याच्या तोंडाला काळे फासू, प्रसंगी मुख्यमंत्र्यांना काळे फासू असा इशारा, शिवसेनेच्या स्थानिक नेत्या स्मिता अष्टेकर यांनी दिला आहे. मगर येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा सज्जड इशारा दिला.

    अहमदनगर : आता अति होत आहे, त्यामुळे शहरातून कोणी नगरसेवक फुटल्यास त्याच्या तोंडाला काळे फासू, प्रसंगी मुख्यमंत्र्यांना काळे फासू असा इशारा, शिवसेनेच्या स्थानिक नेत्या स्मिता अष्टेकर यांनी दिला आहे. मगर येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा सज्जड इशारा दिला.

    राज्यात सध्या रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. शिवसेनेमधून एकनाथ शिंदे गट फुटल्यानंतर सध्या कोण कोणत्या गटांमध्ये आहे याबाबत दावे प्रति दावे सुरू आहेत. अनेक जण आज एका गटात असताना दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटाच्या व्यासपीठवर दिसू लागले आहेत. त्यामुळे आता दोन्ही गटांनी प्रतिज्ञापत्र घेण्याचं सपाटा लावला आहे. राज्यात आमदार खासदार यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी खेचण्यासाठी शिंदे गट मोठा प्रयत्न करत असून, प्रत्येक जिल्ह्यातून नगरसेवक आपल्या गटात घेण्यासाठी शिंदे गट आक्रमक पद्धतीने काम करत आहे.

    अहमदनगर शहरातील शिवसेना महिला आघाडी प्रमुख स्मिता अष्टेकर यांनी याबाबत रोखठोक भूमिका मांडली असून हा खेळ थांबला नाही तर थेट मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला आहे. आणि जर नगर शहरातील कोणी नगरसेवक पदाधिकारी एकनाथ शिंदे गटाबरोबर गेल्यास त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी बंडखोर करणाऱ्या नेत्यांना दिला आहे. स्मिता अष्टेकर या आक्रमक शिवसेना नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. या अगोदरही त्यांनी नगर मधे अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत.