eknath shinde and sanjay raut

यावर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण साजरा करणार, यावर शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटाने मुंबई महापालिकेकडे एक महिन्यापूर्वीच मैदान मिळावं म्हणून अर्ज केला आहे. त्यामुळं मैदान नेमकं कोण मारतंय, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

    मुंबई : मागील वर्षी शिंदे गटाने शिवसेनेत मोठे बंड केले. यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली. दरम्यान, पक्ष व चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यानंतर अनेकवेळा ठाकरे गट व शिंदे गट आमनेसामने आले आहेत. मागील वर्षी शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याचा वाद कोर्टात पोहचला होता. त्यावेळी कोर्टानं ठाकरे गटाच्या बाजूनी कौल दिला होता. यानंतर यावर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण साजरा करणार, यावर शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटाने मुंबई महापालिकेकडे एक महिन्यापूर्वीच मैदान मिळावं म्हणून अर्ज केला आहे. त्यामुळं मैदान नेमकं कोण मारतंय, याकडे सर्वाचे लक्ष आहे. (otherwise call the army from Delhi, but the Dussehra gathering will be held at Shivtirtha”, what challenge did Sanjay Raut give to the Shinde group)

    नाहीतर दिल्लीतून आर्मी बोलावा, पण…

    दरम्यान, आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. त्यामुळे आमचाच पक्ष खरा असल्याने आम्हाला दसरा मेळावा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. हा मेळावा आजकाल होत नाही. ५० ते ५५ वर्षांची परंपरा आहे. आम्हाला चिरडून टाका…. किंवा दिल्लीहून आर्मी बोलवा. पण आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल, असं थेट आव्हानच संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिलं आहे.

    खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच…

    तुम्ही कितीही आव्हानं द्या, रॅली होणारच आणि ही रॅली शिवतीर्थावरच होणार. तुमच्या सत्तेने आम्हाला चिरडण्याचं काम केलं तरी काही फरक पडत नाही. पण आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल, असं थेट आव्हानच संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, तेव्हा एकनाथ शिंदे फक्त ठाण्याचे नगरसेवक होते. ते नंतर आमदार, मंत्री झाले. हे सर्व त्यांना उद्धव ठाकरेंनी दिलं. त्यामुळे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. असं संजय राऊत म्हणाले.