“…अन्यथा या सरकारचा अंत होईल, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा नाहीतर…”, बच्चू कडूंनी सरकारला काय दिलाय इशारा?

तीन दिवसानंतर लाठीचार्ज झाल्यानंतर सरकारने माफी मागितली आहे. तर आज सरकारचे तीन मंत्री जालन्यात आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. यावर संतप्त प्रतिक्रिया येत असताना, आता शिंदे गटातीने नेते व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर देत, सरकारला इशारा दिला आहे.

  जालना – जालन्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्दा पेटला आहे. पोलिसांनी आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाचे वातावरण असून, याचे सर्वंत्र पडसाद पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज राज्यातील विविध भागात आज बंद पाळण्यात येणार आहे. काही ठिकाणी रास्ता रोको, मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहे. तर तर काही ठिकाणी मोर्चामुळं शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या असून, एसटी वाहतूकीवर देखील याचा परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, तीन दिवसानंतर लाठीचार्ज झाल्यानंतर सरकारने माफी मागितली आहे. तर आज सरकारचे तीन मंत्री जालन्यात आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. यावर संतप्त प्रतिक्रिया येत असताना, आता शिंदे गटातीने नेते व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर देत, सरकारला इशारा दिला आहे. (otherwise this government will end, resolve the issue of Maratha reservation or else…”, what is Bachchu Kadu’s warning to the government)

  …अन्यथा या सरकारचा अंत होईल – कडू

  दरम्यान, सध्या मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे-पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालवली आहे. मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन केव्हा येतात, याची वाट पाहतो, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर दुसरीकडे या घटनेबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तीन दिवसानंतर माफी मागितली असताना, बच्चू कडूंनी सरकारला संतप्त इशारा दिला आहे. “या सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ मार्गा लावावा, अन्यथा या सरकारचा अंत होईल”, असा कडूंनी म्हटलं आहे.

  मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या

  काल माध्यमांशी बोलताना, जरांगे-पाटील म्हणाले की, सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेलसरकारने येताना मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा. बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ हे अपेक्षित नाही. तुम्ही पहिले पाढे पुन्हा पुन्हा सांगू नका. जीआर आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही. उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

  सरकारचे शिष्टमंडळ आज जालन्यात…

  दुसरीकडे लाठीचार्ज झाल्यानंतर तीन दिवसानंतर सरकारने आंदोलनकर्त्यांची माफी मागितली आहे. तर आज सरकारचे तीन मंत्री जालन्यात आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. यावेळी ते उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करुन, उपोषण मागे घ्या अशी विनंती करणार आहेत. तर सरकारने येताना मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा. बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ हे अपेक्षित नाही. अशी भूमिक घेतली आहे. त्यामुळं आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

  यवतमाळ व कोल्हापुरमध्ये बंदची हाक
  दरम्यान, मराठा आंदोलकावंर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर शहरातील प्राथमिक शाळांना सुट्टी देखील देण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील प्राथमिक शाळांना आज सुट्टी जाहिर करण्यात आलीये. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद राहणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तर जिल्ह्यातील एसटी वाहतूक देखील आज बंद राहणार आहे. तर दुसरीकडे यवतमाळमध्ये देखील बंदची हाक देण्यात आली आहे.