संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

गडहिंग्लज शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा

    भुदरगड : गडहिंग्लज शहरामध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून खुप मोठ्या प्रमाणात नागरिक अबालवृद्ध लोकांना त्रास होत आहे. सकाळी वयोवृद्ध नागरिक फिरायला जातात. सकाळी महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी यांची संख्या जास्त असून मोकाट कुत्र्यांचा त्यांना नाहक त्रास होत आहे.

    याआधी लहान मुलांच्या किंवा वृद्ध नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहे.प्रत्येक वेळी मनसेच्यावतीने अंदोलनाची वाट प्रशासन बघत असत का? असा प्रश्न पडतो.प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून गडहिंग्लज मधील नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा अधिकाऱ्यांच्या खुर्चीला मोकाट कुत्री बांधू व होणाऱ्या परिणामस प्रशासन जबाबदर राहील असा इशारा नागेश चौगुले जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर यांनी दिला आहे.

    यावेळी प्रभात साबळे, जिल्हा अध्यक्ष मनविसे केप्पांना कोरी, शहर अध्यक्ष संदीप कुरबेट्टी, उपशहर अध्यक्ष अनिता पाटील, नीता कदम, इंदुबाई जाधव, सुगंधा अस्वले, विद्याराणी जाधव, प्रियांका कीर्तिकर, राजमाता विश्व्कर्मा, दिव्यांनी अवताडे आदी उपस्थित होते.