….नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता

नारायण राणेंनी एक ट्वीट करत म्हटले की, "शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता..." राणे यांच्या सूटक ट्विटने राजकीय खळबळ उडाली आहे.

    मुंबई : विधान परिषद निकालानंतर (MLC Election) राज्यात धक्कादायक राजकीय घडामोडी घडत आहेत. नॉट रिचेबल (Not Reachable) असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सुरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरून शिवसेनेत खळबळ उडाली असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सूचक ट्वीट केले आहे.

    विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस असल्याचे उघड झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे अनेक आमदार नॉट रिचेबल आहेत. यावर नारायण राणेंनी एक ट्वीट करत म्हटले की, “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता…”


    राणे यांच्या सूटक ट्विटने राजकीय खळबळ उडाली आहे. आनंद दिघे (Anand Dighe) हे ठाणे (Thane) जिल्ह्यातील शिवसेनेचे वरिष्ठ नेते होते. त्यांच्या निधनाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यावरून नुकतेच चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.