After the Chief Minister's statement, 17 lakh government employees are preparing to withdraw their strike
After the Chief Minister's statement, 17 lakh government employees are preparing to withdraw their strike

आमचा दसरा मेळावा ऐतिहासिक व जोरात होईल असं मुख्यमंत्री व शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिवसेना व शिंद गट आपपल्या दसरा मेळाव्याला लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहे. बसेस, गाड्या आदी वाहनातून राज्यभरातून लोकं मुंबईत येतील असा विश्वास शिंदे गटाला आहे. त्यामुळं शिंदे गटाकडून राज्यभरातून १८०० बसेस सोडण्यात येणार आहेत, या बसेससाठी १० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गट व शिवसैनिक (Shivsainik) अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट व उद्धव ठाकरेंची शिवसेनेला (Shivsena) कोर्टाची (Court) पायरी चढावी लागली. यानंतर शिवसेनेला दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी कोर्टानी दिली आहे. परंतू दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी तसेच यावर राजकारण होताना दिसत आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा होणार आहे, तर बीकेसीत (BKC) शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

    दरम्यान, आमचा दसरा मेळावा ऐतिहासिक व जोरात होईल असं मुख्यमंत्री व शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिवसेना व शिंद गट आपपल्या दसरा मेळाव्याला लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहे. बसेस, गाड्या आदी वाहनातून राज्यभरातून लोकं मुंबईत येतील असा विश्वास शिंदे गटाला आहे. त्यामुळं शिंदे गटाकडून राज्यभरातून १८०० बसेस सोडण्यात येणार आहेत, या बसेससाठी १० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. तर अडीच लाख फूड पॅकेटची ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यभरातून लोकं येणार आहेत, त्यामुळं त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी लोकांच्या प्रवासाची तसेच जेवणाची सोय शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. हा सर्वांमुळं आमचा दसरा मेळावा ऐतिहासिक व जोरात होईल असं मुख्यमंत्री व शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.