“आज आम्ही जात्यात…, उद्या तुम्ही सुपात, 2024 मध्ये केंद्रात व राज्यात आमचे सरकार येणार…, INS विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली?, संजय राऊतांचा सवाल

आपल्या विरोधकांचा निवडणुकीत (Election) पराभव करता येणार नाही, म्हणून निवडणुकांसाठी राजकीय विरोधकांना खोटे खटले टाकायचे आणि त्यांच्यावर कार्यवाही करायची, असे सत्र सध्या भाजपच्या लोकांनी आरंभलेल आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी भाजपावर केली.

  मुंबई – केंद्रात भाजपाला (BJP) रोखण्यासाठी इंडिया अलायन्सच्या 31 आणि 1 तारीख संदर्भात  होणाऱ्या बैठकीच्या तयारीला वेग आलेला आहे. दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर शरसंधान साधले. या देशातील देशभक्त पक्ष एकत्र आले आहेत. भाजप विरोधकांवर ज्या प्रकारची कार्यवाही सुरु आहे, आपल्या विरोधकांचा निवडणुकीत (Election) पराभव करता येणार नाही, म्हणून निवडणुकांसाठी राजकीय विरोधकांना खोटे खटले टाकायचे आणि त्यांच्यावर कार्यवाही करायची, असे सत्र सध्या भाजपच्या लोकांनी आरंभलेल आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी भाजपावर केली.

  दबावाखालून बाहेर पडणार नाही…
  दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आपण कुठलाही पक्ष इंडिया अलायन्समधून या दबावाखालून बाहेर पडणार नाही. परंतू भाजपाच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राचे पोलीस ज्या पद्धतीने कार्यवाही करत आहेत, त्यांनी पहिलं कायद्याचं वाचन करावं, असा टोला राऊतांनी पोलिसांना लगावला. 2024 मध्ये केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार येत आहे. हे या सगळ्यांनी लक्षात ठेवावं. असा इशारा संजय राऊतांनी विरोधकांनी दिला.

  आज आम्ही जात्यात…
  फोन टॅपिंग प्रकरण का बंद केलं, या प्रकरणाचे पुरावे असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी का होऊ दिली नाही? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच आयएनएस विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली? सुषमा अंधारे निकाल एक प्रकरण बाहेर काढलं का चौकशी होत नाही? आज आम्ही जात्यात आहोत, उद्या तुम्ही सुपात आहात, 2024 नंतर हे सगळं उलट होईल, असं देखील राऊत बोलायला विसरले नाहीत.

  कोण बावनकुळे?

  चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. असा प्रश्न राऊतांना विचारला असता, चंद्रशेखर बावनकुळे कोण आहेत? माहित नाही मला. असं उत्तर देत, यावर बोलणं टाळलं.