उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली का? ते सांगायच नसतं.’ असं म्हणत भाजप नेत्याने वाढवला भेटीबाबतचा सस्पेन्स

विधान परिषदेच्या १० जागांसाठी उद्या सोमवार दिनांक २० जून रोजी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र, उद्याच्या निवडणुकीत विजय आमचाच होईल, महाविकास आघाडीत अनेक आमदार नाराज असून त्या नाराज आमदारांची मते देखील आम्हालाच मिळतील असा विश्वास भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे(Our own victory in the Legislative Council; BJP leader Ram Shinde's claim).

    मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी उद्या सोमवार दिनांक २० जून रोजी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र, उद्याच्या निवडणुकीत विजय आमचाच होईल, महाविकास आघाडीत अनेक आमदार नाराज असून त्या नाराज आमदारांची मते देखील आम्हालाच मिळतील असा विश्वास भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे(Our own victory in the Legislative Council; BJP leader Ram Shinde’s claim).

    निवडणुकीतील पाचव्या जागेवरील उमेदवार कसा निवडून आणायचा, यासाठी भाजप सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळी रणनिती आखायला सुरुवात केली असतानाच उद्याच्या निवडणुकीत विजय आमचाच होईल अस राम कदम म्हणाले.

    महाविकास आघाडीत अनेक आमदार नाराज असून त्या आमदारांची मते देखील आपल्यालाच मिळतील असे वक्तव्य राम कदम यांनी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवाय यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली का? असा प्रश्न विचारला असता, ‘ते सांगायच नसतं.’ असं म्हणत त्यांनी भेटीबाबतचा सस्पेन्स देखील ठेवला आहे.

    दरम्यान, विजय आमचाच होणार आहे त्यामूळेच चेहऱ्यावर आनंद असल्याचंही ते पत्रकारांना म्हणाले. राम शिंदे यांचा मुक्काम हॉटेल ट्रायडण्टमध्ये आहे. मात्र, भाजपचे इतर आमदार ताजमध्ये मुक्कामाला असताना शिंदेंचा मुक्काम मात्र ट्रायडण्टला असल्यामुळे देखील राजकीय चर्चा रंगल्या आहेत.