राजनंदिनी
राजनंदिनी

दोन मुली झाल्याचा राग मनात ठेवत स्वतःच्या पत्नीला मॉर्निंग वॉकला नेत विहिरीत ढकलून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. (Husband killed his wife )पत्नी राजनंदिनी हिचा पाय घसरून पडल्याचा पतीचा कांगावा पोलिसांनी अचूक हेरला.

  इस्लामपूर : दोन मुली झाल्याचा राग मनात ठेवत स्वतःच्या पत्नीला मॉर्निंग वॉकला नेत विहिरीत ढकलून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. (Husband killed his wife )पत्नी राजनंदिनी हिचा पाय घसरून पडल्याचा पतीचा कांगावा पोलिसांनी अचूक हेरला. याप्रकरणी ( वय ३०) याला पोलिसांनी अटक केली आहे.(Kolhapur Crime) न्यायालयाने २२ तारखेपर्यंत कौस्तुभ याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

  कौस्तुभ कृष्णराव सरनोबत

  मृत राजनंदिनी हिचा भाऊ मिलिंद नानासो सावंत – भोसले ( २८ , रा . कोल्हापूर ) यांनी राजनंदिनीचा खून पती कौस्तुभने केल्याची फिर्याद इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

  पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, राजनंदिनी हिचे माहेर कोल्हापूर (Kolhapur Crime)होते. तिचे लग्न कौस्तुभ याचेशी ३१ मार्च २०१५ ला झाले. त्यांना राजलक्ष्मी (वय ७ वर्षे) कु. संयोगिता (वय 6 महिने) अशा दोन मुली आहेत. कौस्तुभ हा राजनंदिनी हिस त्रास देत होता. तिला दुसरी मुलगी झालेनंतर हा त्रास वाढला होता.तसेच लग्नात झालेला ३४ हजारांचा खर्च माहेरच्या लोकांनी दिला नाही, याचा राग मनात धरून राजनंदिनी हिला घरातील सर्व जण टोचून बोलत होते. त्याबाबत तिने होणारा त्रास माहेरी कोल्हापूर येथे फोन करून वेळोवेळी सांगितला होता. कौस्तुभ हा काहीही कामधंदा करत नव्हता व घरातच पडून असायचा, त्यावरून नवरा बायको मध्ये सतत वाद होत होता.” काही कामधंदा करा”, असे नवऱ्याला सुचवल्यावर तो राजनंदिनीला शिवीगाळ व मारहाण करायचा, असा आरोप राजनंदिनीच्या भावाने केला आहे.

  असा रचला कट
  मृत राजनंदिनी ही कधीही सकाळी चालण्यासाठी जात नव्हती. राजनंदिनी मृत झाली त्या विहीरीच्या बाजूला असलेल्या गवतामध्ये पती कौस्तुभ याच्या चपला एकमेकांपासून १० ते १२ फुट अंतरावर मिळून आल्या आहेत. विहीरीजवळ बाथरूमला जाणे शक्यच नाही. तिथे गेल्यावर पाण्यात पाय घसरून पडल्याची माहिती पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी दिली गेली. राहत्या घरापासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावर घटनास्थळ आहे. तिथपर्यंत जाण्याचा रस्ता खराब व निर्जन आहे. इथे राजनंदिनी हिला मारण्याच्या हेतूनेचं कौस्तुभ याने आपल्या मोटरसायकलवरून नेले. असा आरोप मृत राजनंदिनीच्या भावाने फिर्यादीत केला आहे. तसेच संशयित कौस्तुभ याच्या अंगावरील भगव्या रंगाचा टी शर्टवर पुढील बाजूस मळल्याच्या खुणा दिसत होत्या. त्याच्या उजव्या हाताचे दंडाचे कोप-यालगत पाठीमागील बाजूस ओरखडल्याच्या खुणा होत्या.

  गुन्ह्याचा घटनाक्रम

  – कौस्तुभ हा पत्नी राजनंदिनीला कापूसखेड रोडला मोटरसायकलवरून रविवारी सकाळी साडे पाचला पहाटे फिरायला घेवून गेला.

  – पाण्याने भरलेल्या विहिरीच्या कडेला नेवून राजनंदिनीला पोहता येत नसल्याचे माहित असताना विहिरीत ढकलून दिले .

  – ही घटना घडल्यानंतर राजनंदिनी ही लघुशंकेसाठी गेली असता ; विहिरीत पाय घसरून पडून तिचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला. आणि पोलीसांना कौस्तुभ याने तशी माहिती दिली होती.

  – त्याचवेळी राजनंदिनीच्या माहेरी कळवले.

  – सकाळी राजनंदिनी हिच्या आई-वडीलांसह व भाऊ मिलिंद यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मृत्यू बाबत घातपात असल्याचा संशय व्यक्त केला.

  – रात्री उशिरा पोलिसांनी राजनंदिनीच्या खून प्रकरणी पती कौस्तुभला अटक केली.

  मुलाच्या हव्यासापोटी दोन मुली पोरक्या..!

  दोन मुलीचं झाल्या याचा मानत राग धरून पत्नी राजनंदिनी हिचा कौस्तुभ याने खून केला. त्याला आतां जेलची हवा खावी लागेल. आई गेली तर वडील तुरुंगात गेल्याने राजलक्ष्मी (वय ७ वर्षे) कु. संयोगिता (वय ६ महिने) अशा दोन मुली पोरक्या झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.