
या सरकारचे करायचे काय? खाली मुंडी, वर पाय, अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने पाटण येथे साखळी आंदोलनाच्या आठव्या दिवशी शहरातून सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. ही अंत्ययात्रा आंदोलन ठिकाणापासून झेंडा चौक, लायब्ररी चौक व पुन्हा झेंडा चौकात या यात्रेचे विसर्जन करण्यात आले.
पाटण : या सरकारचे करायचे काय? खाली मुंडी, वर पाय, अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने पाटण येथे साखळी आंदोलनाच्या आठव्या दिवशी शहरातून सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. ही अंत्ययात्रा आंदोलन ठिकाणापासून झेंडा चौक, लायब्ररी चौक व पुन्हा झेंडा चौकात या यात्रेचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी मराठा बांधवांनी सरकार व सर्व पक्षीय नेत्यांच्या विरोधात मोठा आक्रोश करून मराठा आरक्षणाची मागणी केली. या अंत्ययात्रेत मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील मराठा समाजाचे साखळी आंदोलन मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार शांततेच्या मार्गाने सुरू आहे. येथील आंदोलनात सरकारच्या विरोधात दररोज वेगवेगळे उपक्रम राबवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आठव्या दिवशी मराठा आंदोलकांनी सरकार व राज्यातील सर्व पक्षीय मुख्य नेत्यांची शहरातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला. पाटण शहरातून सूरू झालेले हे आंदोलन गावोगावी पसरत चालले आहे. विविध गावे, वाड्यावस्त्यांची यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच विविध सामाजिक संघटना प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठींबा देत आहेत.
आत्तपर्यंत शेतकरी संघटना, मुस्लीम बांधव, वकील संघटना तसेच डॉक्टर्स असोसिएशन यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच तालुक्यातील सुमारे ५० गावांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली आहे.