outcry of aai ekvira devotees near the thane collectorate aai ekvira bhakti shakti federations statement to the collector for action nrvb

सदर भाविकांच्या समूहाला सर्वेश तरे, गणेश पाटील, शैलेश भोईर यांनी शांतेतेचे अन सलोखा राखण्याचे आवाहन करत मार्गदर्शन केले. सोबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करु असे समजावत जिल्हाधिकारी, पोलीसआयुक्त, ठाणे पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. भेटी दरम्यान लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

    कल्याण : आई एकविरा (Aai Ekvira) आक्षेपार्ह वक्तव्या (Offensive Statement) संदर्भात आई एकविरा भक्ती-शक्ती महासंघाच्या शिष्टमंडळाने (Aai Ekvira by a delegation of Bhakti Shakti Federation) ठाणे जिल्हाधिकारी (Thane Collector), ठाणे पोलीस आयुक्त (Thane Police Commissioner), ठाणे पोलीस अधीक्षक (Thane Superintendent of Police) यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यासाठी भेटून चर्चा करत निवेदन देण्यात आले. त्या दरम्यान रायगड, मुंबई,नवी-मुंबई, पालघर, कल्याण-डोंबिवली येथील एकविरा भक्त आक्रोशासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानजीक जमले होते.

    सदर भाविकांच्या समूहाला सर्वेश तरे, गणेश पाटील, शैलेश भोईर यांनी शांतेतेचे अन सलोखा राखण्याचे आवाहन करत मार्गदर्शन केले. सोबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करु असे समजावत जिल्हाधिकारी, पोलीसआयुक्त, ठाणे पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. भेटी दरम्यान लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अन तदनंतर तात्काळ दोषींवर कारवाईदेखील चालू झाली आहे. पनवेल पोलिसांनी शैलेश शेंडगे या आरोपीस सोलापूर येथून अटकही केली. हे निवेदन देण्यासाठी एकविरा भक्ती-शक्ती महासंघाचे शैलेश भोईर, संकेत गायकवाड, मोरेश्वर पाटील, रवी भोईर, अमर पाटील, मितेश गायकर, नितीन सर्वेश तरे, गणेश पाटील उपस्थित होते.