करमाळ्यात पीआरसी सदस्यांचा संताप; आमदार गुट्टेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं

करमाळा पंचायत समितीने राजशिष्टाचार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला. गुरुवारी पंचायतराज समिती दौऱ्यावेळी विधानमंडळ सदस्य आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या सत्काराचा प्रोटोकॉल चुकल्याने संतापले.

    करमाळा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : करमाळा पंचायत समितीने राजशिष्टाचार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला. गुरुवारी पंचायतराज समिती दौऱ्यावेळी विधानमंडळ सदस्य आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या सत्काराचा प्रोटोकॉल चुकल्याने संतापले.

    सूत्रसंचालन करणाऱ्यांनी आमदार गुट्टे यांचे नाव सर्वांत शेवटी पुकारण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सत्कार करण्यासाठी पुढे आले तेव्हा ते संतापले.
    पंचायत राज समितीच्या वतीने पीआरसी कमिटी सदस्यांनी आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीपूर्वी समितीमधील सदस्यांचा करमाळ्याची कुलस्वामीनी कमलादेवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

    यावेळी झालेले सत्कार प्रोटोकॉलनुसार झाले नाहीत. आमदार रत्नाकर गुट्टे यांचा सत्कार सर्वात शेवटी करण्यात आला. त्यावर गुट्टे यांनी संताप व्यक्त करत सर्वांसमोरच ‘तुम्हाला प्रोटोकॉलची समज नाही का?’ असे खडे बोल सुनावले त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी स्वामी यांनी एक शब्दही काढला नाही.

    करमाळ्यात पंचायत राज समितीचे सदस्य येणार म्हणून सकाळपासून तयारी करण्यात आली होती. मात्र सदस्य साडेपाच वाजता आले. त्यानंतर स्वागताचा कार्यक्रम झाला.