लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्र्यांना बोलू न दिल्याने संताप; मंचर राष्ट्रवादीकडून निषेध

देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांना जाणूनबुजून भाषण करण्यापासून डावलण्यात आल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत.

    मंचर : देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांना जाणूनबुजून भाषण करण्यापासून डावलण्यात आल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. या कृत्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाचा राष्ट्रवादीचे मंचर शहराध्यक्ष सुहास बाणखेले यांनी निषेध केला.

    छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन

    देहू येथील मंदिराच्या लोकापर्ण सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी संधी दिली नसल्याच्या निषेधार्थ मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करण्यात आला.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जो अन्याय झाला, तो अन्याय संपूर्ण महाराष्ट्राचा असल्याचे सांगत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या पीएमओ  कार्यालयाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.