p k singh as president of state skating association and rajendra joshi as general secretary nrvb

शालेय, विद्यापीठ स्तर ते अगदी ऑलीम्पिक मध्ये खेळला जाणारा स्केटिंग या शासन मान्य ताप्राप्त क्रीडा प्रकारचे महाराष्ट्रात स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या मान्यताप्राप्त अधिकृत एकविध राज्यसंघटने अंतर्गत विविध जिल्हा संघटनेच्या माध्यमातून या खेळाचा प्रचार प्रसारासह दर्जेदार गुणवंत खेळाडू घडविण्याचे कार्य केले जात आहे.

    कल्याण : स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (Skating Association of Maharashtra) या राज्य संघटनेची कल्याणच्या डॉन बॉस्को (Don Bosco)  या शाळेमध्ये पंचवार्षिक निवडणूक पार पडली. प्रा. पुष्पेंदरकुमार सिंग (Prof Pushpender Kumar Singh) यांची अध्यक्षपदी (President) बिनविरोध निवड करत सर्व जिल्हा संघटनांनी पुन्हा एकदा राज्य संघटनेची धुरा सिंग यांच्याकडे दिली आहे. राज्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी ठाणे संघटनेचे गणेश राव तर सचिव पदी पुण्याचे राजेंद्र जोशी तर नाशिकचे बुलंगे यांची खजिनदारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून भविष्यात राज्यातून अधिकाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यावर भर असणार असल्याचे अध्यक्ष प्रा. पी. के.सिंग यांनी सांगितले.

    शालेय, विद्यापीठ स्तर ते अगदी ऑलीम्पिक मध्ये खेळला जाणारा स्केटिंग या शासन मान्य ताप्राप्त क्रीडा प्रकारचे महाराष्ट्रात स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या मान्यताप्राप्त अधिकृत एकविध राज्यसंघटने अंतर्गत विविध जिल्हा संघटनेच्या माध्यमातून या खेळाचा प्रचार प्रसारासह दर्जेदार गुणवंत खेळाडू घडविण्याचे कार्य केले जात आहे.

    हे सुद्धा वाचा

    पी. के. सिंग यांच्या मागील ५ वर्षाच्या कार्यकाळात राज्यात या खेळाच्या वाढीसह खेळाडूंचा दर्जाही उंचावला असून याची प्रचितीही गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील राज्यातील पदक तालिकेतून दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी दर्जेदार स्केटिंग मैदानी नर्मिती करण्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. परिणामी स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची झालेल्या निवडणुकीत राज्य संघटनेशी संलग्न असणाऱ्या २९ जिल्ह्यातील प्रतिनिधींनी सहभागी झाले होते.

    राज्य संघटनेच्या निवडलेल्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष पी के सिंग-मुंबई, उपाध्यक्ष गणेश राव-ठाणे, महेश कदम-कोल्हापूर, महादेव शेजुळ-परभणी, उपेंद्र वर्मा-नागपूर, आशुतोष जगताप-पुणे, महासचिव राजेंद्र जोशी-पुणे, सहसचिव आदेश सिंग-मुंबई, श्रीपाद शिंदे-पुणे, सुनील शिरसाट-जळगाव, सतीश गायकवाड-अहमदनगर, अजय भटकर-छत्रपती संभाजीनगर, कोषाध्यक्ष डी एस बुलंगे-नाशिक, सदस्य प्रवीण गडदे-उस्मानाबाद, सतीश कापसे-जालना यांचा समावेश आहे.