पाजनारा तळहिरा पाझर तलाव मोजतोय अखेरची घटका! बेसुमार पाणी उपश्यामुळे तलाव झाला कोरडा

कोरेगावच्या उत्तर दुष्काळी भागातील अनेक गावांना पाणी पाजनारा तळहिरा पाझर तलाव तलावातील सुरू असलेल्या पानी उपश्यामुळे सद्या अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे या भागातील अनेक गावांसाठी पुढील काही दिवसात दुष्काळाच संकट अधिक गडद होणार आहे.

  कोरेगाव : कोरेगावच्या उत्तर दुष्काळी भागातील अनेक गावांना पाणी पाजनारा तळहिरा पाझर तलाव तलावातील सुरू असलेल्या पानी उपश्यामुळे सद्या अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे या भागातील अनेक गावांसाठी पुढील काही दिवसात दुष्काळाच संकट अधिक गडद होणार आहे.

  मागील अनेक वर्षापासून तलाव परिसरात पावसाने दडी मारल्याने हा तलाव भरलेला नव्हता चालू वर्षीही अशीच परस्थिती राहिल्याने तलावात केवळ 50 टक्के पाणीसाठा शिल्लक होता हा पाणीसाठा ही तलाव परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी उपसा करत संपवला असल्याने आता हा तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे या मुळे या तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील अनेक गावात पाणी टंचाई समस्या जाणवणार आहे.

  देऊर गावातील शेकडो हेक्टर शेतीसाठी हा तलाव उपयुक्त आहे तलाव भरल्यानंतर परिसरातील 2 ते 3 किलोमिटर अंतरावर असलेल्या विहिरी कूपनलिकांच्या पाणीसाठ्यात वाढ होते मात्र तलाव कोरड पडल्याने आता परिसरातील विहिरी कूपनलिका आता कोरड्या पडू लागल्या आहेत याचा परिणाम या परिसरातील बागायत क्षेत्र कमी होणार आहे.

  या तलावातील उपसा होणाऱ्या पाणीसाठ्याबाबत कोरेगाव तहसीलदार, प्रांत अधिकारी यांना कळवूनही त्यांनीही या कडे दुर्लक्ष्य केल्याने आता हा तलाव अखेरची घटका मोजत आहे. आजही या तलावात असलेल्या 1 ते 2 टक्के पाणीसाठा उपसा करण्यावर ठाम आहेत त्यामुळे आता जनावरांनाही पाणी मिळणं मुश्किल होणार आहे.

  तर हा तलाव वर्षातून किमान 6 वेळा पूर्ण भरेल
  उत्तर दुष्काळी भागाला पाणी पाजनारा तळहिरा पाझर तलाव दुष्काळी परिस्थितीत कायम भरण्यासाठी या तलावात जीहे कठापुर योजनेतील पाणी सोडावे या मागणी साठी राजकीय गट तट बाजूला ठेवून एकत्र या असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांनी केलं आहे.