Pakistan Gully In Maharashtra

जालन्यातील परतुरमध्ये एका गल्लीच नाव चक्क पाकिस्तान गल्ली असं आढळून आले आहे. परतूर नगर पालिकेच्या मालमत्ता कर आकारणीच्या पावतीत हा प्रकार समोर आलाय. सध्या परतूर नगर पालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे(Pakistan Gully In Maharashtra).

    परतुरमध्ये पाकिस्तान गल्ली असल्याचा उल्लेख पालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या मालमत्ता कर आकारणीच्या पावतीत आढळून आल्यानं संतापाची लाट उसळली आहे. शिवाय पालिकेत चाललेला अनागोंदी कारभार देखील या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

    परतुरचे भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी यावर सवाल उपस्थित करत परतुरमध्ये काँग्रेसला पाकिस्तान निर्माण करायचा आहे का असा सवाल उपस्थित करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

    निवडणूक जवळ आल्याने काँग्रेसनं हा मुद्दाम खोडसाळपणा केला असून हा खोडसाळपणा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोणीकरांनी केली आहे.