पाकिस्तान फक्त एकाच नावाला घाबरत होता ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मी शेतकऱ्याचा मुलगा पण मी आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री झालो सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा पण मी आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री झालो ही जादू बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. त्यांच्या विचाराने प्रत्येकाला ताकद, ऊर्जा येते. अन्याय सहन करू नका. अन्यायाविरुद्ध लढा ही बाळासाहेबांची शिकवण.

  मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आज झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तैलचित्राचे अनावरण केले.

  बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्ही स्थापन केले
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आजचा दिवस सर्वांसाठी महत्वाचा आणि आनंदाचा आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा पगडा आणि प्रभाव आमच्यावर होता. त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहचलो. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्ही स्थापन केले. बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीची अमलबजावणी केली. एकेकारी ठाराविक घराण्यांची सत्ता होती. पण बाळासाहेबांमुळेच सत्ता सामान्यांपर्यंत पोहचली. राजकारणात संधी अशांना मिळाली. पदस्पर्शाने अशांचे सोने झाले.

  मी शेतकऱ्याचा मुलगा पण मी आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री झालो
  सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा पण मी आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री झालो ही जादू बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. त्यांच्या विचाराने प्रत्येकाला ताकद, ऊर्जा येते. अन्याय सहन करू नका. अन्यायाविरुद्ध लढा ही बाळासाहेबांची शिकवण. त्यांच्याबद्दल कंठही दाटून येतो.

  बाळासाहेबांचा शब्द तो शब्दच
  सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शब्दच. शब्द फिरवायचा नाही ही त्यांची शिकवण आम्ही शिकलो. अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण त्यांनी दिली. त्यामुळेच या महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या. शेवटी धाडस महत्वाचे असते. धाडस करायला हिंमत, ताकद लागते. त्यासाठी गुरूदेखील तेवढे धाडसी हवे. बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख, गुरुस्थानी होते. आज आनंद दिघे असते तर त्यांचा ऊर भरून आला असता. त्यांना समाधान मिळाले असते.

  पाकिस्तान बाळासाहेबांना घाबरायच
  सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, हिमालयाएवढा नेता बाळासाहेब ठाकरे. पाकिस्तानदेखील कुठल्याही नेता, राष्ट्रपती, पंतप्रधानांना घाबरत नव्हता. फक्त एकाच नावाला घाबरल होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांमुळे ठाण्यात पंचवीस वर्षांपासून आपलीच सत्ता आहे. बाळासाहेबांनी धाडस दिले ते पुढे घेऊन आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेबांनी अन्यायाविरोधात ताकद, लढण्याचे विचार त्यांनी दिले.