
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) पालघर त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून निर्दोष सुटल्याबाबत अहवाल मागण्यात आला होता.
पालघर : अतिरिक्त सत्र न्यायालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वर्ग १ (सरकारी वकील) सुनील बाबुराव सावंत यांना ७००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून हुतात्मा स्तंभाजवळ रंगेहाथ पकडण्यात आले. सावंत हे गेल्या सात वर्षांपासून पालघर येथील नायालयात सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत होते.
पालघर जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक यांच्यावर सन २०१५ मध्ये तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३/१५ कलम ३७६ भादविप्रमाणे दाखल होता. जून २०२३ मध्ये न्यायालयाने तक्रारदार यास निर्दोषमुक्त करण्यात आले होते. पालघर जिल्हा पोलीस दलाकडून तक्रारदार यांनी पदोन्नतीसाठी अर्ज केला होता. त्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) पालघर त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून निर्दोष सुटल्याबाबत अहवाल मागण्यात आला होता. तो अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यासंबंधी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली असता तडजोड करण्यात आल्यावर सात हजार रुपये लाचेची रक्कम ठरवण्यात आली व ती रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून हुतात्मा स्तंभाजवळ रंगेहाथ पकडण्यात आले.
सापळा पथक
दयानंद गावडे, पोलीस उपअधीक्षक, शिरीष चौधरी, पोलीस निरीक्षक,
पोह. अमित चव्हाण, पोह. संजय सुतार, पोह. नवनाथ भगत, पोह. नितीन पागधरे, पोह. योगेश धारणे, मपोह. निशिगंधा मांजरेकर, मपोना. स्वाती तारवी आणि पोशिचा. जितेंद्र गवळी यांनी सहभाग घेतला.