पालघर रेल्वे गोळीबार प्रकरण: धार्मिक आकसातून गोळीबार झाल्याची माहिती, प्रत्यक्षदर्शीने सांगितला…

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल चेतनला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने गोळीबार का केला? त्यामागचं कारण काय? नेमकं काय घडलं होतं? असे सवाल त्याला करण्यात येत आहेत. दरम्यान, चेतनने धार्मिक आकसातून गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे.

    पालघर – आपण चालत्या रेल्वेमध्ये हाणामारी किंवा गोळीबारचे दृश्य एखाद्या सिनेमात पाहिले आहे. मात्र अशीच काहीशी घटना (31, जुलै, सोमवारी) जयपूर ते मुंबई पॅसेजर एक्सप्रेसमध्ये (jaipur to mumbai passenger express) घडली आहे. या गोळीबारात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तसेच यामध्ये एका पोलिसांचा देखील मृत्यू झाला आहे. पालघर ते विरारदरम्यान (Palghar to viriar) हा गोळीबार झाला आहे. सुरुवातीला हवेत गोळीबार केल्याची माहीत समोर येत आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या घटनेचा जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांकडून तपास सुरु आहे. या घटनेमुळं एकच खळबळ माजली असून, माथेफिरू कॉन्स्टेबलमुळे हकनाक चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल चेतनला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने गोळीबार का केला? त्यामागचं कारण काय? नेमकं काय घडलं होतं? असे सवाल त्याला करण्यात येत आहेत. दरम्यान, चेतनने धार्मिक आकसातून गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. (Palghar railway firing case: Information about firing from religious motives, eyewitness said)

    धार्मिकआकसातून गोळीबार?

    मिळालेल्या माहितीनुसार आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या अनुभवानुसार माथेफिरु चेतनने आधी वरिष्ठ सहकारी टिकाराम मिना यांच्यावर गोळ्या घातल्या. यानंतर त्याने मोहम्मह हुसेन आणि असगर अब्बास यांना वाटेत पुढे सरकत गोळया घातल्या. तसेच यावेळी असगर अब्बास हा शेवटच्या घटका मोजता असताना, त्याने  असगरच्या छातीवर पाय देत त्याने धार्मिक घोषणा दिल्या. तसेच पुढे येत त्याने सैफुदिन मैनुदि्द या तिसऱ्या प्रवाशाला पेन्ट्रीत फरफटत नेत याच्यावर गोळ्या घातल्या. असे चार प्रवाशांना माथेफिरु चेतनने गोळ्या घातल्या. यानंतर तो धार्मिक घोषणा देत होता, असं प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले आहे.

    नेमकं काय घडल?

    दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार चेतन आणि त्याचे वरिष्ठ कॉन्सटेबल एएसआय टिकाराम मीना हे रेल्वेच्या एकाच बोगीत बसले होते. मात्र काही कारणारुन या दोघांत वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, याचे रुपांतर भांडणात झाले. आणि चेतनला राग आला. याने त्यांनी थेट स्व;ताकडील पिस्तुल काढत वरिष्ठ कॉन्सटेबल एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. यानंतर हा प्रकार थांबविण्यासाठी गेलेल्या प्रवाशांवर देखील मातेफिरु चेतनने गोळीबार केला. यात तीन प्रवाशांचा हाकनाक जीव गेला. पुढील तपास रेल्वे पोलिस करताहेत. ही घटना सकाळी साडे पाच वाजता घडली आहे. यावेळी प्रवाशी झोपेत होते. गोळीच्या आवाजाने प्रवाशांना जाग आल्यावर घडलेला प्रकार लक्षात आला, असं बोगीतील प्रवाशांनी घडलेला धक्कादाय प्रकार सांगितला. ही गोळीबाराची घटना ट्रेन क्रमांक 12956च्या बोगीनंबर B-5 मध्ये ही घटना घडली.