वाढवण बंदराविरोधात पालघरवासीय आक्रमक; संघर्ष समितीचा मंत्रालयावर मोर्चा

केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील या आंदोलनासाठी डहाणू, पालघर भागातील शेकडो कार्यकर्ते रेल्वे लोकलमधून सकाळीच मुंबईकडे रवाना झाले आहेत. सुमारे २५ हजार कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली होती. या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. 

    मुंबई – पालघर (Palghar) जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात (Vadhavan Port) आज स्थानिक नागरिक मुंबईत मंत्रालयावर (Ministry) मोर्चा (March) काढला आहे. प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. हा विरोध तीव्र करण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने (Sangharsh Samiti) मोर्चा काढला आहे.

    केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील या आंदोलनासाठी डहाणू, पालघर भागातील शेकडो कार्यकर्ते रेल्वे लोकलमधून सकाळीच मुंबईकडे रवाना झाले आहेत. सुमारे २५ हजार कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली होती. या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे.

    पालघर जिल्ह्यात तयार करण्यात येणारे वाढवण बंदर रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मच्छीमार बांधव आक्रमक झाले आहेत. वाढवण बंदर प्रकल्पामुळे किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या मच्छीमार बांधवांचा पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय अडचणीत येणार आहे. प्रकल्पाचा परिणाम जैवविविधतेवर होऊन माशांच्या प्रजातींनाही धोका निर्माण होणार असल्याची भीती आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार बांधवांचे जनजीवन विस्कळीत होईल, यासाठी मागील काही वर्षांपासून मच्छीमार बांधव तीव्र विरोध करत आहेत.