पलूस तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ देणार: संग्राम देशमुख

पलूस  तालुक्यातील नवीन रक्तांच्या युवकांना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना राजकीय क्षेत्रात भाजपाच्या व युती सरकारच्या माध्यमातून बळ देण्याचे सुतोवाच सांगली जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले.

    पलूस : पलूस  तालुक्यातील नवीन रक्तांच्या युवकांना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना राजकीय क्षेत्रात भाजपाच्या व युती सरकारच्या माध्यमातून बळ देण्याचे सुतोवाच सांगली जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले.

    संतगाव ( ता. पलूस ) येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित पाटील, सुरेश पाटील, पलूस तालुका भाजपा अध्यक्ष विजय पाटील, पलूस तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सागर सूर्यवंशी, राजेंद्र लाड प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंकज पाटील,अमर जाधव, सुदर्शन सावंत,संकेत जाधव, विक्रम जाधव, सौरभ जाधव, रोहन सावंत यांनी संग्राम  देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला.

    देशमुख म्हणाले, भाजपाच्या विचाराला अनुसरुन व स्व.संपतराव देशमुख यांच्या संघर्षमय नेतृत्वातून पलूस-कडेगाव तालुक्यातील नवीन पिढी घडत आहे. राजकारणात सामान्य लोकांचे हित लक्षात घेवून आम्ही नेहमी लोकहितासाठी संघर्ष केला.

    पृथ्वीराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पलुस तालुक्यातील संघटीत कार्यकर्त्यांना अधिक अधिक ताकत देण्याचे काम येणाऱ्या काळात करणार असल्याचे संग्राम देशमुख यांनी सांगितले. यावेळी सुधीर चौगुले, संदीप आवटे, मोहित पाटील, तुषार पाटील, रविन्द्र बिरनाळे, प्रेमचंद सूर्यवंशी, प्रविण चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.